Chhagan Bhujbal : राज ठाकरे यांचा महायुतीला पाठिंबा; छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

Chhagan Bhujbal : राज ठाकरे यांचा महायुतीला पाठिंबा; छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी परंतु फक्त नरेंद्र मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा देत आहे. असे राज ठाकरे म्हणाले.

यावर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. छगन भुजबळ म्हणाले की, एक कार्यकर्ता जर आपल्याला भेटला आणि आपल्या पक्षामध्ये आला तर आपल्याला आनंद होतो.

राज ठाकरे तर एका पक्षाचे प्रमुख आहेत. या महाराष्ट्रामध्ये त्यांचे नाव आहे. त्यांचासुद्धा लोकमाणसांवर प्रभाव आहे. त्यामुळे ते आल्यामुळे किंवा त्यांनी पाठिंबा दिल्यामुळे महायुतीची ताकद निश्चितपणे वाढेल. असे छगन भुजबळ म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com