छगन भुजबळ शरद पवारांना जेलमधून ब्लॅकमेल करायचे! तुरुंगातून बाहेर पडताच रमेश कदमांचा खळबळजनक दावा

छगन भुजबळ शरद पवारांना जेलमधून ब्लॅकमेल करायचे! तुरुंगातून बाहेर पडताच रमेश कदमांचा खळबळजनक दावा

माजी आमदार रमेश कदम यांचा खळबळजनक दावा
Published by :
shweta walge

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विद्यमान मंत्री छगन भुजबळ हे आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी तुरुंगात असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना ब्लॅकमेल करायचे, असा खळबळजनक दावा माजी आमदार रमेश कदम यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे. अण्णा भाऊ साठी महामंडळ घोटाळ्याप्रकरणी 8 वर्षांनंतर राष्ट्रवादीचे माजी आमदार रमेश कदम यांची ठाणे मध्यवर्ती कारागृहातून सुटका झाली आहे.

रमेश कदम यांनी म्हटले, छगन भुजबळ शरद पवार यांना जेल मधून ब्लॅक मेल करायचे. जामिनासाठी भुजबळांची धडपड सुरू होती. आपला जामीन झाला नाही तर मला वेगळा मार्ग स्वीकारावा लागेल असा इशारा देत भुजबळ त्यांना ब्लॅकमेल करत असल्याचा दावा कदम यांनी केला.

छगन भुजबळ तुरुंगात असताना त्यांच्याशी भेट होत असे. त्यावेळी भुजबळ हे पवार साहेबांनी मला मदत केली पाहिजे. जामिनाला खूपच उशीर होत आहे असं म्हणत नाराजी बोलून दाखवायचे, असं रमेश कदम यांनी म्हटले.

छगन भुजबळ शरद पवारांना जेलमधून ब्लॅकमेल करायचे! तुरुंगातून बाहेर पडताच रमेश कदमांचा खळबळजनक दावा
जळगावातील अनोखी परंपरा! मानाचा गणपतीच्या वतीने दर्ग्यावर चादर, मुस्लिम बांधवांची मिरवणुकीवर पुष्पवृष्टी

सत्तेतील आताचे छगन भुजबळ आणि तुरुंगातील मधील छगन भुजबळ खूप फरक आहे असल्याचे रमेश कदम यांनी म्हटले. जेलमध्ये ते रोज आजारी पडायचे. काकूळतीला यायचे त्यांना रोज उपचाराची गरज होती. जेल मधून बाहेर आल्यापासून आम्ही बातमी ऐकली नाही छगन भुजबक यांच्या छातीत दुखतंय असं म्हणत कदम यांनी टोला लगावला. जेलमध्ये गेलं की लोक आजारी पडतात त्यांना माहीत आहे. सहानुभूती मिळवून कशी बेल मिळवायची हे देखील त्यांना माहित आहे. परंतु जेल ही कोणाच्या नशिबात येऊ नये नरक आहे असेही त्यांनी म्हटले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com