16 नोव्हेंबरलाच राजीनामा दिला, छगन भुजबळ यांचं सर्वात मोठं वक्तव्य; गौप्यस्फोटाने खळबळ

16 नोव्हेंबरलाच राजीनामा दिला, छगन भुजबळ यांचं सर्वात मोठं वक्तव्य; गौप्यस्फोटाने खळबळ

राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरच निशाणा साधला आहे.

राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरच निशाणा साधला आहे. तसेच 17 नोव्हेंबरला ओबीसीची पहिली रॅली अंबडला झाली. 16 नोव्हेंबरलाच मी मंत्रिमंडळाच राजीनामा देऊन सभेला गेलो. अडीच महिने मी शांत राहिलो. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी सांगितले वाच्यता नको, असा गौप्यस्फोट छगन भुजबळ यांनी ओबीसी महाएल्गार मेळाव्यातून केला आहे.

ते म्हणाले की, नगरमध्ये ओबीसी एल्गार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी भुजबळ यांनी मुख्यमंत्र्यांनाच थेट सवाल केला. मला म्हणता भुजबळ राजीनामा द्या म्हणतात. एक आमदार बडबडला भुजबळांना लाथ मारून मंत्रिमंडळातून काढलं पाहिजे. मला सर्वांना सांगायचं आहे मी राजीनामा दिला. 16 नोव्हेंबर रोजीच मंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि अंबडच्या सभेला गेलो. मी राजीनामा दिला आहे. तुम्ही त्यांना जाऊन सांगा, असं मोठं विधान छगन भुजबळ यांनी केलं आहे. 17 तारखेला पहिली ओबीसी सभा होती. त्याआधीच राजीनामा दिला होता, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका करत म्हणाले की, मला मुख्यमंत्र्यांचा अवमान करायचा नाही. पण त्यांनी सांगितलं माझी शपथ पूर्ण झाली. तुमची शपथ पूर्ण झालीय. मराठा समाजाला आरक्षण मिळालंय. तर मग सर्व्हेक्षण कशासाठी करत आहात? असा संतप्त सवाल छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केला आहे.

16 नोव्हेंबरलाच राजीनामा दिला, छगन भुजबळ यांचं सर्वात मोठं वक्तव्य; गौप्यस्फोटाने खळबळ
Chhagan Bhujbal : ...तर राजीनामा देईन; असं भुजबळ का म्हणाले?

यावेळी त्यांनी अध्यादेशावरून मनोज जरांगे पाटील यांची खिल्ली उडवली. तुम्ही 27 तारखेला गुलाल उधळला. मग आता उपोषण कशाला करत आहात? अध्यादेश आणि मसुदा यातील फरक याला कळत नाही. मराठा समाज्याला आरक्षण मिळाला पाहिजे. आमचा विरोध नाही, मात्र आमच्या ताटातले घेऊ नका, असं सांगतानाच सर्व्हेक्षण करायला अर्धा तास जातो. अनेक वेळा आकडेवारी वाढवली जाते, खाडाखोड सुरू आहे. आता आरक्षण मिळालंय. गुलाल उधळलाय. मग आता खोटे रेकॉर्ड करायचे काम का सुरू आहे? जामखेड येथे खोटे दाखले दिले जात आहेत. अनेक ठिकाणी खोटे दाखले करायचे काम सुरू आहे, असा दावा छगन भुजबळ यांनी केला.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com