Chhatrapati Sambhaji Nagar : 15 मिनीटांमध्ये 10 लाखांच्या मोबाईलची चोरी, नेमकं प्रकरण काय?

Chhatrapati Sambhaji Nagar : 15 मिनीटांमध्ये 10 लाखांच्या मोबाईलची चोरी, नेमकं प्रकरण काय?

छत्रपती संभाजीनगर: व्हीआयपी रोडवर 15 मिनिटांत 10 लाखांचे मोबाइल चोरी
Published by :
Published on

छत्रपती संभाजीनगरमधील व्हीआयपी रोडवर एक अजब प्रकार समोर आला. रस्त्यावर वाहतूक सुरू असतानाच चोरट्यांनी बेडशीटचा आडोसा घेत केवळ 15 मिनिटांत 10 लाख रुपयांच्या 58 मोबाइल लंपास केले. हा प्रकार बुधवारी (१६ एप्रिल) उघडकीस आला असून परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भडकलगेट परिसरातील रहिवासी मुदसीरद्दीन अनिसुद्दीन काझी (37) यांची मोबाइल शॉपी व्हीआयपी रोडवर आहे. 15 एप्रिल रोजी रात्री 10.45 वाजता त्यांनी नेहमीप्रमाणे दुकान बंद केल होते. मात्र मध्यरात्री सुमारे दोनच्या सुमारास एक चोरटा दुकानाजवळ येतो आणि काही वेळातच आणखी सहाजण त्याच्याकडे येतात. त्यांपैकी दोन चोरटे बॅगमधून मोठं बेडशीट बाहेर काढतात आणि दुकानासमोर आडोसा निर्माण करतात. या आडोशातून एका सडपातळ चोरटा दुकानाचे शटर उघडून प्रवेश केला. केवळ 15 मिनिटांत त्यानी 58 महागडे मोबाइल फोन चोरले. चोरट्यांनी मोबाइलचे बॉक्स दुकानातच टाकून दिले आणि मोबाइल बॅगमध्ये भरून पसार झाले.

ही संपूर्ण घटना दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या प्रकरणी बेगमपुरा पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com