Astik Kumar Pandey
Astik Kumar PandeyTeam Lokshahi

छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांना 'ईडी'ची नोटीस; 'या' प्रकरणामुळे पाण्डेय यांना नोटीस

जिल्हाधिकारी पाण्डेय यांना आजच मुंबईच्या ईडी कार्यालयात नोटीसीद्वारे चौकशीसाठी हजर राहण्यास ईडीने सांगितले.

ईडी म्हणजेच सक्तवसुली संचलनालयाकडून राजकीय नेत्यांवर होणाऱ्या कारवाईमुळे ईडीची कायम चर्चा होत असताना आता ईडीची नजर आता प्रशासकीय अधिकाऱ्यांवर गेली आहे. पंतप्रधान आवास योजनेच्या निविदा प्रक्रियेत घोटाळा प्रकरणात छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी तसेच तत्कालीन महापालिका आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांना ईडीकडून नोटीस बजावण्यात आली आहे. ईडीने नोटीसीद्वारे जिल्हाधिकारी पाण्डेय यांना आजच मुंबईच्या ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे. यासोबतच या योजनेत यापूर्वी महानगरपालिकेच्या उपायुक्त अपर्णा थेटे यांची देखील चौकशी करण्यात आली होती.

Astik Kumar Pandey
उध्दव ठाकरे यांच्या सभेला गांभीर्याने घ्यायची गरज नाही, शिंदे गटाचे उध्दव ठाकरेंना प्रत्युत्तर

नेमकं काय प्रकरण?

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका विभागात ४० हजार घरे बांधण्यासाठी 4 हजार कोटी रुपयांच्या बांधकाम निविदा काढण्यात आल्या होत्या. मात्र या टेंडर प्रक्रियेत कंपनीकडून घोटाळा करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला असून या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल आहे. त्यानंतर हे प्रकरण ईडीकडे वर्ग करण्यात आले. त्यानंतर ज्या कंपनीला कंत्राट मिळाले त्या संबंधित लोकांच्या निवासस्थानांवर ईडीकडून छापे टाकण्यात आले होते. याच प्रकरणात आता संभाजीनगरचे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांना ईडीने नोटीस बजावली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com