ताज्या बातम्या
Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti : छत्रपती शिवाजी महाराजांची आज तिथीनुसार जयंती
छत्रपती शिवाजी महाराज यांची आज तिथीनुसार जयंती आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांची आज तिथीनुसार जयंती आहे. तिथीनुसार यंदा आज 17 मार्च रोजी देशभरात शिवजयंती साजरी केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्यासह देशात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले आहे.
यासोबतच शिवनेरी गडावर दीपोत्सव आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तिथीनुसार साजऱ्या होणाऱ्या शिवजयंतीला देशभरातून शिवभक्त येणार असल्याची शक्यता आहे. राज्यभरात शिवभक्तांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे.