छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार जाहीर

छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार जाहीर

वन विभागाच्या सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने वृक्ष लागवड व संवर्धन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्ती, संस्थांना देण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.

वन विभागाच्या सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने वृक्ष लागवड व संवर्धन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्ती, संस्थांना देण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. २०१८ आणि २०१९ या दोन वर्षांच्या पुरस्कारांमध्ये व्यक्ती गटात प्रथम पुरस्कार अनुक्रमे रघुनाथ ढोले (पुणे) आणि किसन गारगोटे (पुणे) यांना जाहीर झाला आहे. १ लाख रुपये रोख, मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

विविध गटांतील पुरस्कारांमध्ये व्यक्ती, ग्रामपंचायत, शैक्षणिक संस्था, सेवाभावी संस्था यांना राज्य, विभाग, जिल्हा पातळीवरील पुरस्काराने गौरविण्यात येते. राज्यस्तरीय पुरस्कारांमध्ये सर्व गटांमध्ये पुरस्काराचे स्वरूप एक लाख, ७५ हजार आणि ५० हजार रुपये तर विभागीय गटात ५० आणि ३० हजार रुपये असे स्वरूप आहे.

राज्यस्तरीय २०१८ च्या राज्यस्तरीय प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या पुरस्कार्थींची नावे पुढील प्रमाणे

व्यक्ती - रघुनाथ ढोले (पुणे), सुधाकर देशमुख (बीड), रोहित बनसोडे (पुणे)

शैक्षणिक संस्था - कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय नांदगांव (नाशिक), एसएमसी इंग्लिश मीडियम स्कूल (वाशीम), शिवाजी कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय, कन्नड औरंगाबाद

सेवाभावी संस्था - आधार फाउंडेशन (रुकडी) कोल्हापूर, मराठवाडा जनविकास संघ (पिंपळे गुरव, पुणे), श्री अष्टविनायक शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळ (जळगांव)

ग्रामपंचायत - ग्रामपंचायत बिदाल, ता. माण (जि. सातारा), ग्रामपंचायत पुणतांबा (नगर), चिंचणी (पंढरपूर, जि. सोलापूर)

संस्था - जिल्हा परिषद - कोल्हापूर आणि पोलिस अधीक्षक कार्यालय, सातारा

राज्यस्तरीय २०१९ च्या राज्यस्तरीय प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या पुरस्कार्थींची नावे पुढील प्रमाणे

व्यक्ती - किसन गारगोटे (पाषाण, पुणे), सुशांत घोडके (कोपरगाव, नगर), सुनील वाणी (जळगांव)

शैक्षणिक संस्था - मुधोजी महाविद्यालय, फलटण जि. सातारा, कर्मवीर काकासाहेब वाघ महाविद्यालय, निफाड (नाशिक), स्व. दादासाहेब उंडाळकर महाविद्यालय, कराड (सातारा)

Lokshahi Marathi
www.lokshahi.com