Devendra Fadnavis
Devendra Fadnavis

Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अर्थसंकल्पीय नियोजनाला सुरुवात; आज 'या' जिल्ह्यांचा आढावा घेतला जाणार

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 23 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Devendra Fadnavis) राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 23 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. 6 मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अर्थसंकल्प सादर करणार असून हे अधिवेशन 25 मार्चपर्यंत चालणार आहे.

याच पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अर्थसंकल्पीय नियोजनाला सुरुवात करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. मुख्यमंत्र्यांकडून आज पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि कोकणातील जिल्ह्यांचा आढावा घेतला जाणार असून तिन्ही विभागातील पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांचीही उपस्थिती असणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रत्येक जिल्ह्यातील अर्थ नियोजनाच्या प्रस्ताव सादरीकरणाच्या बैठकांना ऑनलाइन हजर राहणार असून काल मुख्यमंत्र्यांकडून विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांच्या बैठका घेण्यात आल्या.

Summary

  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अर्थसंकल्पीय नियोजनाला सुरुवात

  • मुख्यमंत्र्यांकडून आज पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि कोकणातील जिल्ह्यांचा आढावा घेतला जाणार

  • तिन्ही विभागातील पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांचीही उपस्थिती असणार

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com