Devendra Fadnavis On MNS : "भाषेच्या नावावर गुंडशाही..." मराठी भाषा वादावरुन फडणवीसांचा मनसेला इशारा
5 जुलैला होणाऱ्या ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची जंगी तयारी सुरु आहे. मराठी भाषेसाठी ठाकरेंनी जोर धरुन ठेवलेला राज्यभरात पाहायला मिळाला. सुरुवातीपासूनच मनसे मराठी माणसासाठी आणि मराठी भाषेसाठी आक्रमक असल्याचे पाहायला मिळाली आहे. अनेक वेळा मनसे कार्यकर्त्यांकडून यावरुन धाक दाखवत आल्याचं देखील पाहायला मिळालं आहे.
असं असताना आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसेवर मराठी भाषेवरुन निशाणा साधला आहे. भाषेच्या नावावर मारहाण करण चुकीचं असल्याचं फडणवीसांनी म्हटलं आहे. तसेच भाषा येत नसेल तर व्यापाऱ्याची चुक काय असं देखील फडणवीसांनी विचारलं आहे. मराठी येत नाही म्हणून व्यापाऱ्यांनी व्यवसाय करु नये का? असा देखील प्रश्न फडणवीसांनी यावेळी विचारला आहे.
दरम्यान देवेंद्र फडणवीस म्हणाले की," केवळ मारहाण करण हे चुकीचं आहे, आम्ही मराठी आहोत आणि आम्हाला मराठीचा अभिमान आहे. महाराष्ट्रात मराठी बोलली गेली पाहिजे, हा आग्रह चुकीचा नाही. पण, एखाद्या व्यवसायकाला मराठी येत नाही म्हणून त्याला मारहाण करण हे अत्यंत चुकीच आहे. आपले अनेक मराठी भाषिक वेगवेगळ्या राज्यात व्यवसाय करतात".
"त्यातल्या अनेकांना तिथली भाषा येत नाही, म्हणून काय त्यांच्यासोबत पण अशीच वागणुक होईल का? भारतामध्ये अशाप्रकारची गुंडशाही ही बरोबर नाही त्यामुळे त्याच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल. कॅबिनेटचा निर्णय घेणारे ते, सही करणारे ते आणि विजय मेळावा घेणारे देखील तेच. त्यामुळे मराठी माणसाला हे दिसून येत आहे की, कोण दुटप्पी आहे. त्यामुळे मराठी मुलांच्या हिताचा विराच करुन निर्णय घेतला जाईल".