Alhad Kaloti : आल्हाद कलोतींची चिखलदरा नगरपरिषदेत बिनविरोध निवड, फडणवीसांचे अभिनंदन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मामेभाऊ आल्हाद कलोती यांनी राजकारणात पदार्पण केले आहे. चिखलदऱ्याचा सर्वांगीण विकास हा त्यांचा मुख्य अजेंडा
Published by :
Riddhi Vanne

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मामेभाऊ आल्हाद कलोती यांनी राजकारणात पदार्पण केले आहे. चिखलदऱ्याचा सर्वांगीण विकास हा त्यांचा मुख्य अजेंडा असून, त्यांनी नुकताच चिखलदरा नगरपरिषदेसाठी नामांकन अर्ज दाखल केला आहे. ही निवडणूक राज्यात लक्षवेधी ठरली असून, सर्वांचे लक्ष निकालाकडे होते. याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.

सध्या राज्यात निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. येत्या काही दिवसांतच नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी मतदान होऊन निकाल लागेल. तर त्यानंतर महापालिका निवडणुकांचे पडघम वाजू लागतील. नगरपरिषदेच्या निवडणुकांसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख जवळ येत चालली असून त्याच पार्श्वभूमीवर अनेकांची नामांकन अर्ज दाखल करण्याची लगबग सुरू आहे. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मामे भाऊ देखील पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरत असून त्यांची नगरपरिषदेत बिनविरोध निवड झाली आहे. अल्लाद कलोती फडणवीस यांचे मामेभाऊ आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com