राजपूत समाजापुढील ‘भामटा’ हा शब्द काढणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Admin

राजपूत समाजापुढील ‘भामटा’ हा शब्द काढणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

छत्रपती संभाजीनगर शहरात सकल राजपूत समाजाच्या वतीने वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह महासंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.
Published by :
Siddhi Naringrekar

छत्रपती संभाजीनगर शहरात सकल राजपूत समाजाच्या वतीने वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह महासंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.

मुख्यमंत्री म्हणाले की, राजपूत समाजाच्या मागण्या सोडविण्यासाठी हे सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. शिवाय महाराणा प्रतापसिंह यांनी अकबराच्या सैन्याला जेरीस आणले. हे दोन्ही धर्मवीर राजे आपल्या भूमीत होऊन गेले. यांचा आदर्श घेऊन आपण पुढे जात आहोत. असे ते म्हणाले.

यासोबतच राजपूत समाजाचे आर्थिक महामंडळ स्थापन करण्यात येणार असून महाराणा प्रताप यांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्यात येणार आणि राजपूत समाजापुढील ‘भामटा’ हा शब्द काढून टाकण्याची मागणी राज्य सरकारने मान्य केल्याची घोषणा करून आता यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करण्यात येईल. असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com