...तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ताफ्यात साप सोडू; संभाजीनगरच्या पँथर्स आर्मीचा इशारा
Admin

...तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ताफ्यात साप सोडू; संभाजीनगरच्या पँथर्स आर्मीचा इशारा

छत्रपती संभाजीनगर शहरातील हर्सूल टी पॉईंट येथे गौतम बुद्धांचा पुतळा बसवण्याची मागणी केली जात आहे.

छत्रपती संभाजीनगर शहरातील हर्सूल टी पॉईंट येथे गौतम बुद्धांचा पुतळा बसवण्याची मागणी केली जात आहे. जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ असलेल्या वेरूळ अजिंठा लेणीकडे जाताना हर्सूल टी पॉईंट येथे तथागत भगवान गौतम बुद्ध यांचा पुतळा बसविण्याबाबत पँथर्स आर्मीच्या वतीनं शासनाकडे मागणी करण्यात येत आहे.

या मागणीची दखल घेतली जात नाही आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा छत्रपती संभाजीनगर दौरा आहे. या दौऱ्यापूर्वी पँथर्स आर्मीने इशारा दिला आहे की, राज्य सरकारनं आमच्या या मागणीचा प्राधान्यानं विचार करून तातडीनं हर्सूल टी पॉईंट येथे भगवान गौतम बुद्ध यांचा पुतळा बसवावा, अन्यथा आम्ही मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात साप सोडू. असे त्यांनी म्हटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com