मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रामटेकमधील  भाषणातील प्रमुख 10 मुद्दे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रामटेकमधील भाषणातील प्रमुख 10 मुद्दे

नागपूरमधील रामटेक लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार राजू पारवे यांच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या भाषणातील प्रमुख मुद्दे
Published by :
shweta walge

1. प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नगरीत जगातील एक नंबरचे नेते आणि लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मनापासून स्वागत.

2. गर्मीची लहर असूनही प्रचंड प्रमानात लोकं मोदींना भेटायला अली आहेत. गर्मीपेक्षा मोठी मोदी प्रेमाची देशभरात लहर आहे. देशात सगळीकडे मोदींचा जयजयकार पहायला ऐकायला मिळतो.

3. मोदी जातील तिथे प्रभु श्रीरामाच्या आशीर्वादाने आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशिर्वादाने सुशासन निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.

4. अंगात नाही बळ आणि चिमटा काढून पळ" अशी विरोधकांची अवस्था. विरोधकांच्या टिकेकडे मोदी कायम दुर्लक्ष करतात पण जर त्यांनी त्याकडे लक्ष दिले तर फेसबुक लाईव्ह करण्याऱ्यांचा तोंडाला फेस आल्याशिवाय राहणार नाही. हाती चले बझार...कुत्ते भोंके हजार" अशी विरोधकांची अवस्था आहे.

5. प्रभू श्रीरामाच्या आशिर्वाद असलेले मोदी इंडी अलायन्सची अहंकाराची लंका जाळून टाकतील.

6. विरोधकांचा अजेंडा 'करप्शन फर्स्ट' तर मोदींचा अजेंडा 'नेशन फर्स्ट'...

7. देशाच्या अर्थव्यवस्थेला नव्या उंचीवर घेऊन जाण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. देशाची अर्थव्यवस्था आधी अकराव्या नंबरवरून पाचव्या क्रमांकावर आणि पाचव्या क्रमांकावरून तिसऱ्या नंबरवरही आणले.

8. रोटी, कपडा, मकान देणारे मोदी कुठे आणि भ्रष्टाचाराने बरबटलेले विरोधक कुठे..?

9. एका आदिवासी महिलेला सर्वोच्च पदावर बसवण्याचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदींना

10. लोकं आता मतदानाची वाट पहात आहेत, त्यामुळे नागपूर मधून नितीन गडकरी आणि रामटेक मधून राजू पारवे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करायचे आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com