ताज्या बातम्या
Devendra Fadnavis : अमरावतीच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा 'राज्य सरकार प्रत्येक शेतकऱ्याला 6 हजार देणार'
अमरावतीत फडणवीसांची घोषणा: शेतकऱ्यांना 6 हजार रुपये देणार राज्य सरकार.
राज्य सरकार प्रत्येक शेतकऱ्यांला देणारे अमरावतीमध्ये देवेंद्र फडणवीसांकडून मोठी घोषणा केली. शेतीत गुंतवणूक वाढवून शेती फायद्याची झाली पाहिजे, यासाठी आपले सरकार काम करत आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "शेतीमध्ये गुंतवणूक करायची आज आपल्याला माहिती आहे. मोदीजींनी आपल्याला सहा हजार रुपये देण्यास सुरुवात केली. तेव्हा राज्याने सुद्धा सहा हजार रुपये शेतकऱ्यांना देण्याची सुरुवात केली. शेतीमध्ये रिलिफ आणि रिहॅबिलिटेशन पेक्षा गुंतवणूक वाढवून शेतीसाठी फायद्याची झाली पाहिजे. गुंतवणुक वाढण्याच्या दृष्टीने एक मोठा कार्यक्रम आपण राबलेला आहे. की शेतकऱ्यांना अधिकारिता देऊन शेतकऱ्याची गुंतवणुकीची कॅपसिटी वाढवून शेतीला फायदा झाला पाहिजे. असा प्रयत्न आपला आहे".