Indian Army Social Media Policy : सैनिकांसाठी सोशल मीडिया नियमांमध्ये मोठा बदल

Indian Army Social Media Policy : सैनिकांसाठी सोशल मीडिया नियमांमध्ये मोठा बदल

भारतीय सैनिकांना सोशल मीडिया वापरण्याच्या नियमांमध्ये लष्कराने बदल केले आहे. आता भारतीय सैनिकांना इन्स्टाग्राम ‘व्ह्यू ओन्ली’ मध्ये पाहता येणार आहे.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

भारतीय सैनिकांना सोशल मीडिया वापरण्याच्या नियमांमध्ये लष्कराने बदल केले आहे. आता भारतीय सैनिकांना इन्स्टाग्राम ‘व्ह्यू ओन्ली’ मध्ये पाहता येणार आहे. सैनिकांना इन्स्टाग्रामवर कोणत्याही प्रकारची चॅट करण्यास बंदी कायम ठेवण्यात आली असल्याची माहिती भारतीय लष्कराकडून देण्यात आली आहे.

भारतीय लष्कराने लागू केलेल्या नवीन नियमांनुसार सैनिकांना (Indian Army Social Media Policy) फक्त लेटेस्ट अपडेट मिळावे यासाठी इन्स्टाग्रामवरील (Instagram) कंटेंट पाहण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र इन्स्टाग्रामवर पोस्ट, कमेंट करणे, शेअर करणे आणि कोणत्याही प्रकारची चॅट करण्यास परवानगी नसणार आहे. सोशल मीडियासाठी नवीन नियम लष्कर मुख्यालयाने लष्करी गुप्तचर महासंचालनालय (DGMI) शाखेद्वारे जारी केले आहे. सध्या लागू असणाऱ्या नियमांमध्ये बदल करुन नवीन नियम लागू करण्यात आले आहे.

नवीन नियमांनुसार लष्करी कर्मचारी इन्स्टाग्रामवर (View Only) विचार, मते किंवा चॅटद्वारे संवाद साधणार नाहीत. योग्य आणि सुरक्षित वापराची जबाबदारी पूर्णपणे वैयक्तिक वापरकर्त्यावर टाकण्यात आली आहे. यूट्यूब (YouTube) आणि एक्स सारख्या इतर प्लॅटफॉर्मवरही असेच निर्बंध लागू आहेत, जेथे केवळ व्ह्यू-ओन्ली वापराची परवानगी आहे. लष्कराने व्हीपीएन, टोरेंट वेबसाइट्स, क्रॅक केलेले सॉफ्टवेअर आणि निनावी वेब प्रॉक्सी वापरण्याविरुद्धच्या आपल्या इशाऱ्याचा पुनरुच्चार केला आहे, कारण अशा साधनांशी संबंधित सुरक्षा धोके आहेत. या निर्णयामुळे लष्कराचा डिजिटल जागरूकता आणि ऑपरेशनल सुरक्षा यांच्यात संतुलन साधण्याचा प्रयत्न दिसून येतो, ज्यामुळे सैनिक स्वतःला किंवा त्यांच्या युनिट्सना संभाव्य धोक्यांपासून वाचवून माहिती मिळवू शकतात.

व्हॉट्सअ‍ॅप आणि टेलिग्रामबाबत नियम

लष्कराने इंस्टाग्राम व्यतिरिक्त सोशल मीडिया आणि मेसेजिंग अ‍ॅप्सबाबतच्या धोरणात स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे देखील दिली आहेत. व्हॉट्सअ‍ॅप, टेलिग्राम, सिग्नल आणि स्काईप सारख्या मेसेजिंग अ‍ॅॅप्सवर फक्त कंटेंट माहिती शेअर करण्याची परवानगी देण्यात आली आहे. ही माहिती फक्त ओळखीच्या व्यक्तींसोबत शेअर करता येणार आहे. योग्य व्यक्ती ओळखण्यासाठी वापरकर्ता पूर्णपणे जबाबदार असेल. या प्लॅटफॉर्मवर कोणतीही संवेदनशील, अधिकृत किंवा कर्तव्याशी संबंधित माहिती शेअर करण्याची परवानगी नाही.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com