CM Devendra Fadanvis : '...त्यापैकी एक मराठी भाषा अनिवार्य आहेच' फडणवीस नेमकं काय म्हणाले?

मराठी भाषा अनिवार्य: मुख्यमंत्री फडणवीसांनी राज्यात तीन भाषा शिकवणं महत्त्वाचं असल्याचं म्हटलं.
Published by :
Prachi Nate

राज्यात तीन भाषा शिकवण महत्त्वाचं असल्याचं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. हिंदी भाषेसाठी शिक्षक सहज उपलब्ध होतात, असं म्हणत हिंदी भाषा लादण्याचा प्रयत्न होत आहे हे चुकीचं असल्याच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. इंग्रजी भाषा जवळची आणि हिंदी भाषा दुरची का? असा प्रश्न देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विचारलेला आहे.

मराठीनंतर दुसरी भाषा हिंदी ठेवण सोईस्कर असल्याचं देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. महाराष्ट्रात मराठी भाषा ही सक्तीची आहेच. मात्र तीन पैकी दोन भाषा अनिर्वाय असल्याचं देखील फडणवीस म्हणाले आहेत. त्यापैकी मराठी अनिवार्यच आहे असा खुलासा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलेला आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com