Devendra Fadnavis
Devendra Fadnavis

Devendra Fadnavis : सरकारी विभागांमधून होणाऱ्या अनावश्यक खरेदीवर आळा घालण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतला मोठा निर्णय

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतल्याचे पाहायला मिळत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Devendra Fadnavis ) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतल्याचे पाहायला मिळत आहे. सरकारी विभागांमधून होणाऱ्या अनावश्यक खर्चावर आळा घालण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा मोठा निर्णय घेतला आहे. आता कोणत्याही खरेदी प्रस्तावांना मान्यता देण्यात येणार नाही तसेच नव्या निविदा काढल्या जाणार नसल्याची माहिती मिळत आहे.

हे निर्देश वित्त विभागाकडून सर्व विभागांना देण्यात आले आहेत. आर्थिक वर्ष संपत असताना अनेक विभागांकडून केवळ निधी खर्च करण्यासाठी घाईघाईने खरेदी केली जात असल्याचा अर्थ विभागाकडून आरोप करण्यात आला आहे. नवीन निविदा काढण्यावर आणि खरेदी प्रस्तावांना प्रशासकीय मान्यता देण्यावर बंदी घालण्याचे आदेश देण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. यामध्ये संगणक, उपकरणे, फर्निचर दुरुस्ती, भाड्याने कार्यालय घेणे, सेमिनार, भौतिक कार्यशाळा, ड्रायव्हर मशीन, सुटे भाग या गोष्टींचा यामध्ये समावेश असल्याची माहिती मिळत आहे.

या सर्व आदेशामधून औषधांच्या खरेदीला वगळण्यात आले आहे. शासकीय महामंडळे, प्रशासकीय विभाग, अनुदानित संस्था, नागरी व ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना हा आदेश लागू करण्यात आला आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com