CM Eknath Shinde: मुख्यमंत्री शिंदेंनी केली लाडक्या नातवासोबत रंगपंचमी साजरी

CM Eknath Shinde: मुख्यमंत्री शिंदेंनी केली लाडक्या नातवासोबत रंगपंचमी साजरी

दर वर्षीप्रमाने यंदा देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी होळी साजरी केली. या वेळी त्यांनी ठाण्याच्या घरात त्यांच्या परिवारासोबत रंगपंचमी साजरी केली.
Published by :
Sakshi Patil

दर वर्षीप्रमाने यंदा देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी होळी साजरी केली. या वेळी त्यांनी ठाण्याच्या घरात त्यांच्या परिवारासोबत रंगपंचमी साजरी केली. या खास क्षणांचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

या शेअर केलेल्या फोटोच्या खाली 'रंगूनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा... गुंतूनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा... राजकीय धुळवडीचा धुरळा रोजच उडत असताना आज कुटूंबियांसोबत धुळवडीचा सण साजरा करून थोडे समाधान मिळाले', असं कॅप्शनही त्यांनी दिलं आहे.

दरम्यान, या वेळी लाडका नातू रुद्रांशसोबत नैसर्गिक रंगांची उधळण करत त्यांनी मनसोक्त रंगपंचमी साजरी केली. या सोहळ्यात त्यांची पत्नी लता, मुलगा खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, सून वृषाली तसेच घरात काम करणारे आणि कुटूंबाचा भाग बनलेले सर्व कर्मचारीही सहभागी झाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com