Pune Navale Bridge Accident
Pune Navale Bridge AccidentTeam Lokshahi

नवले ब्रीजवरील अपघाताची मुख्यमंत्र्यांकडून दखल

काल रात्री 10 वाजेच्या सुमारास पुण्यात मोठी दुर्घटना घडली. नवले पूलावर कंटेनरचा ब्रेक फेल होऊन भीषण अपघात झाला.

पुणे : नवले पूलावर कंटेनरचा ब्रेक फेल होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात 10 जण जखमी झाल्याची प्राथामिक माहिती आहे. अपघात इतका भीषण होता, की यात सुमारे 30 ते 47 वाहने एकमेकांवर आदळली. सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या अपघाताची गंभीर दखल घेतली असून चौकशीचे आदेश दिले आहेत.

Pune Navale Bridge Accident
नवले पुलाजवळ भीषण अपघात; भरधाव टँकरची ४८ वाहनांना धडक, ८ जण जखमी

काय आहे घटना?

पुणे शहरातील कायम व्यस्त असलेल्या नवले पुलावर झालेल्या भीषण अपघातात आत्तापर्यंत एकुण 48 वाहने समाविष्ट असल्याचे समजले असून तसेच पीएमआरडीए, अग्निशमन दल बचावकार्य करत आहे. किमान 10 जखमींवर शासकीय रुग्णवाहिका 108 मधे उपचार केल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. गर्दीच्याच वेळी नवले पुलावर ब्रेक निकामी झाल्याने भरधाव आलेल्या टँकरने अनेक वाहनांना धडक देत वाहनांचे प्रचंड नुकसान केले आहे.

Lokshahi Marathi
www.lokshahi.com