भारतावर नव्या संकटाचा धोका; चीनने गमावले आपल्या रॉकेटवरील नियंत्रण

भारतावर नव्या संकटाचा धोका; चीनने गमावले आपल्या रॉकेटवरील नियंत्रण

अंतराळात पाठवण्यात आलेले चीनचे रॉकेट कोणत्याही दिवशी पृथ्वीवर अनियंत्रितपणे प्रवेश करू शकते. हा रॉकेटचा मुख्य भाग आहे.
Published by :
Team Lokshahi

अंतराळात पाठवण्यात आलेले चीनचे रॉकेट (China Rocket) कोणत्याही दिवशी पृथ्वीवर अनियंत्रितपणे प्रवेश करू शकते. हा रॉकेटचा मुख्य भाग आहे. हा साधारण १०० फूट लांब आहे. याचे वजन साधारणपणे २१ टन इतके आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात चीनचे एक रॉकेट पश्चिम आफ्रिका आणि अटलांटिक महासागरमध्ये पडले होते. पश्चिम आफ्रिकेतील एका गावामध्ये हे रॉकेट पडले होते. मात्र आता रॉकेटवरील निंयत्रण सुटल्यानं ते निर्धारित ठिकाणी पडण्याऐवजी नक्की कुठे पडेल या विषयी गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा एकदा अनिश्चितता निर्माण झाली आहे. रॉकेट पृथ्वीवर कोणत्या ठिकाणी पडणार हा प्रश्न निर्माण झाला आहे.

भारतावर नव्या संकटाचा धोका; चीनने गमावले आपल्या रॉकेटवरील नियंत्रण
Maharashtra Government : शिंदे सरकारला एक महिना पूर्ण, मंत्रिमंडळाचा विस्तार अद्याप रखडला

चीनच्या या महाप्रतापाने जगाची डोकेदुखी खुप वाढवली आहे हे निश्चित. आज सायंकाळी ०७:०० ते उद्या पहाटे ०५:०० या दहा तासां दरम्यान लाँग मार्च 5-B चा कोअर सेक्शन पृथ्वीवर पडणार हे निश्चित. याचे शेवटच्या तासातील पासेस आपल्या भारतावरून ही जात असल्याने आपला धोका वाढत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com