Chiplun
Chiplun Team Lokshahi

चिपळूण संगमेश्वर मतदार संघातून रोहन बनेंचे नाव आघाडीवर

रोहन बने यांचा चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातील उमेदवारीचा दावा भक्कम झाला आहे.
Published by :
Sagar Pradhan

निसार शेख|चिपळूण: संगमेश्वर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत 22 पैकी 12 ग्रामपंचायतींवर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे वर्चस्व प्रस्थापित झाले. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात 5 तर 1 ग्रामपंचायत काँग्रेसच्या ताब्यात आल्याने या शिवसेनेचे नेते आणि प्रत्येक वेळच्या संकटसमयी जबाबदारी ओळखून काम करणार्‍या रोहन बने यांचा चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातील उमेदवारीचा दावा भक्कम झाला आहे.

नव्यानेच राजकारणात उतरलेल्या सुपुत्र रोहन बने यांना जिल्हा परिषद अध्यक्षपदाची जबाबदारी मिळाली. काही महिन्यातच कोरोनाचे संकट आले. पाठोपाठ वादळ झाले आणि चिपळुणात पूर आला. अशा संकटसमयी रोहन बने यांनी लक्ष वेधून घेणारे काम केले. त्यानंतर आता शिवसेनेत फाटाफूट होऊन दोन गट पडल्यानंतर आलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांची पक्षीय पातळीवरच्या कामाची कसोटी लागली.

संगमेश्वर तालुक्यातील 36 पैकी 14 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. उर्वरित 24 निवडणुकांमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेकडे 7 ग्रामपंचायती आल्या. गावपॅनलच्या ज्या 5 ग्रामपंचायती आहेत त्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनाप्रणित असल्याचा दावा करण्यात आला आहे. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादीला 5, काँग्रेसला 1 ग्रामपंचायत मिळाली आहे. त्याचवेळी भाजपकडे 2, बाळासाहेबांची शिवसेना म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाकडे एकच ग्रामपंचायत आली. त्याचवेळी मनसेकडेही 1 ग्रामपंचायत गेली आहे. शिवसेनेत फूटपडल्यानंतर जास्तीत जास्त ग्रामपंचायती उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेकडे आणण्यात रोहन बने यांना यश आले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com