ताज्या बातम्या
Chitra Wagh on Bacchu Kadu : 'अडीच वर्षे सत्तेत होतात, आता शेतकरी आठवला ?' चित्रा वाघ यांचा बच्चू कडूंना खोचक टोला
राधाकृष्ण विखे पाटील यांची गाडी फोडणाऱ्याला एक लाख रुपये बक्षीस देऊ असं बच्चू कडू यांनी जाहीर केलं होत. त्यावर चित्रा वाघ यांनी बदलापुरात उपस्थित असताना बच्चू कडू यांच्यावर खोचक टीका केली.
चित्रा वाघ या बदलापुरात भाजप महिलांच्या मेळाव्याला उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी बच्चू कडू यांच्यावर खोचक टीका केली. राधाकृष्ण विखे पाटील यांची गाडी फोडणाऱ्याला एक लाख रुपये बक्षीस देऊ असं बच्चू कडू यांनी जाहीर केलं होत. त्यावर अडीच वर्ष तुम्ही सत्तेत होता, त्यावेळी शेतकऱ्यांना बांधावर येऊन पन्नास हजार रुपये देऊ असं सांगितलं होतं,ते तुम्ही दिलेत का? असा सवाल केला. तसेच आता तुम्हाला शेतकरी आठवला का ?मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं बळीराजाला सहकार्य करण्याचे धोरण आहे. अशी प्रतिक्रिया चित्रा वाघ यांनी दिलीय,चित्रा वाघ बदलापुरात भाजपा महिलांच्या मेळाव्यासाठी आल्या होत्या.
