Chitra Wagh : लाडकी बहीण लाभार्थी महिलांना भाजपच्या चित्रा वाघ यांचं आवाहन म्हणाल्या...

Chitra Wagh : लाडकी बहीण लाभार्थी महिलांना भाजपच्या चित्रा वाघ यांचं आवाहन म्हणाल्या...

लाडकी बहीण लाभार्थी महिलांना भाजपच्या चित्रा वाघ यांनी आवाहन करत एक व्हिडिओ शेअर केला आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

लाडकी बहीण लाभार्थी महिलांना भाजपच्या चित्रा वाघ यांनी आवाहन करत एक व्हिडिओ शेअर केला आहे. चित्रा वाघ म्हणाल्या की, माझी लाडकी बहिण योजना जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे गट, शरद पवार गट आणि काँग्रेसनं ही योजना फसवण्याचा कट आखला आहे.

त्यांच्या शिबिरांमध्ये जे अर्ज भरुन घेतलं जातील त्यामध्ये ते कशा पद्धतीने त्रुटी राहतील याची काळजी ते घेणार आहेत. त्यामुळे काय होणार आहे की, माझ्या माता भगिनींना पैसे मिळणार नाही आहेत. ही योजना आणि त्याचबरोबरीने महायुती सरकारला बदनाम करण्याचा त्यांचा हेतू आहे त्यांचा डाव आहे. अर्जात त्रुटी ठेवायच्या आणि नंतर योजना कशी फसवी आहे याची बोंब मारायची हे त्यांनी ठरवलं आहे.

यासोबतच त्या म्हणाल्या की, म्हणून मला माझ्या माता भगिनींना सांगायचं आहे की, त्यांच्या शिबिरातून अर्ज नक्की घ्या पण अर्ज घेतल्यावर स्वत:हा अॅपवर जाऊन, सेतूकेंद्रावर जाऊन, वेबसाईटवर जाऊन अपलोड करा आणि त्याची पावती घ्यायला विसरु नका. ही योजना तुमच्यासाठी तुमच्या युती सरकारने आणली आहे. त्यामुळे इतरांची दुकानं अजिबात चालू देऊ नका. असे चित्रा वाघ म्हणाल्या.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com