सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय! चित्रपटगृहात बाहेरील अन्नपदार्थ आणि पेय घेऊन जाण्याबाबत सांगितले
Admin

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय! चित्रपटगृहात बाहेरील अन्नपदार्थ आणि पेय घेऊन जाण्याबाबत सांगितले

चित्रपटगृहात अन्नपदार्थ आणि पेय घेऊन जाण्यावरुन चांगलाच वाद पेटला होता.

चित्रपटगृहात अन्नपदार्थ आणि पेय घेऊन जाण्यावरुन चांगलाच वाद पेटला होता. काहींनी याबाबत थेट पोलीस ठाणे गाठले होते तर काहींनी याबाबत थेट कोर्टात धाव घेतली होती. यामध्ये जम्मू काश्मीर मध्ये जुलै 2018 मध्ये उच्च न्यायालयाने निर्देशही दिले होते. त्यामध्ये मल्टिप्लेक्स आणि सिनेमागृहांनी येणाऱ्या प्रेक्षकांना त्यांच्याकडील अन्नपदार्थ आणि पाणी आत आणण्यास प्रतिबंध करू नये असा निकाल दिला होता.

या पार्श्वभूमीवर आता बाहेरील अन्नपदार्थ आणण्यास मुभा द्यायची की नाही, याबाबतही मालक निर्णय घेऊ शकतात, अस सर्वोच्च न्यायालयान म्हटलं आहे. त्यामुळे चित्रपटगृहात जातांना खाद्यपदार्थ आणि पेय घेऊन जाण्यास कुणीही प्रतिबंध करत नव्हते. पण आता प्रतिबंध करू शकणार आहे. नुकताच सर्वोच्च न्यायलयाने तसा निकाल दिला असून जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाने दिलेले निर्देश सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवले आहे. जम्मू काश्मीर मध्ये जुलै 2018 मध्ये उच्च न्यायालयाने निर्देशही दिले होते. त्यामध्ये मल्टिप्लेक्स आणि सिनेमागृहांनी येणाऱ्या प्रेक्षकांना त्यांच्याकडील अन्नपदार्थ आणि पाणी आत आणण्यास प्रतिबंध करू नये असा निकाल दिला होता.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com