हातकणंगलेमध्ये गोंधळ, दोन गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी

हातकणंगलेमध्ये गोंधळ, दोन गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी

हातकंनगले मतदारसंघात वाळवा तालुक्यातील साखराळे गावातील बूथ क्रमाक 62,63 वर घडला हा सगळा प्रकार घडला आहे.
Published by :
shweta walge

महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने आणि महाविकास आघाडीचे उबाठा गटाचे उमेदवार सत्यजीत पाटील सरूडकर यांच्या दोन् गटात जोरात बाचाचची आणि जोरदार हाणामारी झाल्याची बातमी समोर आली आहे. हातकंनगले मतदारसंघात वाळवा तालुक्यातील साखराळे गावातील बूथ क्रमाक 62,63 वर घडला हा सगळा प्रकार घडला आहे.

मतदान केंद्र क्रमांक 62 आणि 63 वर सत्यजित पाटील सरूडकर यांचे बोगस प्रतिनिधी याच्यावर कारवाई करावी अशी मागणी करत धैर्यशील माने यांच्या गटाने मतदान केंद्र काही काळ बंद ठेवले होते. यावरून सत्यजित पाटील सरूडकर याचे कार्यकर्ते आक्रमक होऊन जाब विचारण्या करीता आले असता दोन्ही गटात शाब्दिक वादावादी होऊन जोरदार हाणामारी झाली. यामुळे मतदान काही काळासाठी थांबवावे लागले. पोलिसांनी मध्यस्थी करुन दोन्ही गटातील कार्यकर्त्यांची समजूत काढली. त्यानंतर पुन्हा मतदान सुरु झाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com