मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी २०२३-२४ चा अर्थसंकल्प सादर करताना केली चूक; वाचला 8 ते 10 मिनिटं जुनाच अर्थसंकल्प

मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी २०२३-२४ चा अर्थसंकल्प सादर करताना केली चूक; वाचला 8 ते 10 मिनिटं जुनाच अर्थसंकल्प

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी २०२३-२४ चा अर्थसंकल्प सादर करताना ८ ते १० मिनिटं ते जुनाच अर्थसंकल्प वाचत होते.
Published by :
Siddhi Naringrekar

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी २०२३-२४ चा अर्थसंकल्प सादर करताना ८ ते १० मिनिटं ते जुनाच अर्थसंकल्प वाचत होते. हा प्रकार विरोधी पक्षाच्या लक्षात आला आणि विरोधी पक्षातले आमदार जोरजोराने हसू लागले. दरम्यान, या प्रकरणात अनेक अधिकाऱ्यांवर आता कारवाईचा बडगा उगारला जाऊ शकतो.

विधानसभेत मुख्यमंत्र्यांना अर्थसंकल्पाची जी प्रत सोपवण्यात आली होती त्यामध्ये काही पानं जुनीच होती. अशोक गहलोत यांनी या चुकीसाठी सभागृहाची क्षमा मागितली. परंतु विरोधी पक्षातील नेत्यांनी गोंधळ केला. राजस्थानच्या आजवरच्या इतिहासात पहिल्यांदाच अर्थसंकल्प सादर करताना सभागृहाचं कामकाज स्थगित करावं लागलं.

राजस्थानमध्ये अर्थसंकल्पादरम्यान सभागृहाचे कामकाज तहकूब करण्याची ही पहिलीच वेळ आहे. खरे तर अशोक गेहलोत यांच्या चुकीनंतर विरोधकांनी सभागृहात जोरदार गदारोळ सुरू केला. सभापतींना वारंवार विनंती करूनही विरोधी पक्षनेते मान्य न झाल्याने सभापतींनी सभागृहाचे कामकाज अर्ध्या तासासाठी तहकूब केले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com