CM Devendra Fadnavis: मनपा निवडणुकीत शक्य तिथे मनसेला सोबत घेऊ
महाराष्ट्रामध्ये नुकताच महायुतीचा भव्य शपथविधी सोहळा पार पडला. देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली. त्यानंतर आज पहिल्यांदाच राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत सह्याद्री वाहिनीवर घेण्यात आली. या मुलाखतीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा कारभार पुढील ५ वर्षे कसा चालवणार यावर भाष्य केलं आहे.
शपथविधी सोहळ्यादरम्यान प्रचंड मोठा जनसमुदाय पाहून आनंदही झाला. मात्र, प्रचंड मोठ्या जबाबदारीची जाणीव ही झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे. भाजपच्या एकूण एक कार्यकर्त्याला आनंद झाला.
महाराष्ट्र आता थांबणार नाही...
अडीच वर्षापूर्वी महायुतीचं सरकार आलं. त्यानंतर महाराष्ट्रात प्रचंड वेगाने विकासकार्य केले. जाहिरातीमध्ये महाराष्ट्र आता थांबणार नाही असं म्हटलं, त्या ब्रिदवाक्याचं फडणवीस यांनी विश्लेषण करून सांगितलं. महाराष्ट्राने अडीच वर्षात विकासाची गती घेतली. आता ती गती घेत महाराष्ट्राची प्रगती होईल असं फडणवीस म्हटले.
नदीजोड प्रकल्प, ग्रीन एनर्जीवर भर
नदीजोड प्रकल्पावर भर देणार आहोत. महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी नदीजोड प्रकल्प महत्त्वाचे आहेत. २०३० पर्यंत महाराष्ट्रातील ५२ टक्के वीज ही ग्रीन एनर्जी असणार आहे. शेती आणि उद्योगक्षेत्राला फायदा होईल. यामुळे महाराष्ट्रात रोजगार निर्मिती होईल.
मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका करणार
मुंबईच्या एमएमआर रिजनमध्ये कुठल्याही भागात पोहचायला फक्त एक तासाहून कमी वेळ लागला पाहिजे. त्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. मुंबईतील ६० टक्के ट्रॅफिक वेस्टर्न एक्सप्रेसवेवर असते. मुंबईमध्ये ३७५ किमीचे मेट्रोचं जाळं पसरवणार आहोत. मुंबईकरांचे दिवसांतील ३-४ तास प्रवासामध्ये जातात तो वेळ कमी करणार आहोत. मुंबईमध्ये मराठी माणसाला परवडणाऱ्या घरांसाठी प्रयत्न करणार आहोत.
धारावीकरांच्या विकासासाठी सज्ज
धारावीप्रकल्पाची संकल्पना राजीव गांधी यांच्या काळातील आहे. २०१४ साली आपण मुख्यमंत्री झाल्यानंतर डीपीआर तयार करून नव्याने प्रोजेक्ट तयार केला होता. त्यानंतर सध्याचा तयार केलेला प्रकल्प हा उद्धव ठाकरे यांच्या काळातला आहे. टीडीआरसाठी निविदेचे सक्सेसफूल बीडर अदानी असल्यामुळे ते प्रोजेक्ट त्यांना मिळालं होतं. बीडीडी चाळ अर्बन रिन्यूव्हलचं सगळ्यात मोठं प्रोजेक्ट आहे ते करून दाखवलं. तसंच धारावीचं प्रोजेक्ट करून दाखवणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
विरोधकांनी आत्मचिंतन करावं
ईव्हीएमवरील आरोप देवेंद्र फडणवीस यांनी फेटाळले आहेत. तर राहुल गांधी यांनी पराभवाबाबत आत्मचिंतन करण्याचा सल्ला यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. गेल्या अडीच वर्षात आम्ही दाखवून दिलं आहे की तीन पक्ष एकत्रित काम करू शकतात.
मनसेला सरकारसोबत ठेवणार
लोकसभेमध्ये राज ठाकरे यांनी खुल्या दिलाने पाठिंबा दिला होता. मनसे आणि महायुतीचे विचार मिळते-जुळते आहेत. राज ठाकरे यांना सरकारसोबत ठेवण्यामध्ये आम्हाला आनंदच आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये जिथे शक्य असेल तिथे त्यांना सोबत घेण्याचा प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
संपूर्ण मुलाखत पाहण्यासाठी क्लिक करा-