CM Eknath Shinde: ‘लाडकी बहिण योजना’ लाडक्या बहिंणींसाठी माहेरचा आहेर'
लोकशाही मराठी' या मराठी न्यूज चॅनलतर्फे 'लोकशाही संवाद 2024' संवाद महाराष्ट्राच्या प्रगतीचा या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात महाराष्ट्रातील नामवंत पाहुणे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थिती लावली आहे. यावेळी त्यांनी 17 तारखेला लाडकी बहिण योजनेचे 2 हफ्ते जमा होणार आहेत. लाडकी बहिण योजना फक्त रक्षाबंधनापुरती नाही आहे ही कायमस्वरुपी असल्याचं म्हणाले.
ते म्हणाले की, 17 तारखेला लाडकी बहिण योजनेचे 2 हफ्ते जमा होणार आहेत. लाडकी बहिण योजना फक्त रक्षाबंधनापुरती नाही आहे ही कायमस्वरुपी आहे. दिड कोटी महिलांचे अर्ज आले आहेत. ‘लाडकी बहिण योजना’ लाडक्या बहिंणींसाठी माहेरचा आहेर आहे, आणि हा आहेर तात्पुरता नाही तर कायमस्वरूपी आहे.
मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मिळून हा निर्णय घेतला. हा निर्णय एका वर्षापासून आमच्या डोक्यात होता. एका दिवसात किंवा ताबडतोब अशा कोणत्याही योजनांची घोषणा होत नाही. त्यासाठी तयारी लागते. आणि नियत देखील लागते. ती नियत सरकारची आहे. म्हणून आम्ही ही योजना सुरु केली. ही योजना कोणतीही निवडणुक डोळ्यासमोर ठेवून केलेली नाही.
जेव्हा लेक लाडकी, लखपती योजना, अशा अनेक योजना आम्ही सुरु केल्या तेव्हा कुठे निवडणुका होत्या. या योजनेसाठी पूर्ण आर्थिक वर्षासाठी 33 हजार कोटींची तरतुत केली आहे. हे पैसे अर्थव्यवस्थेमध्येच येणार आहे ज्यामुळे अर्थव्यवस्थेला चालणा मिळेल. महिलांना सक्षम करणे यासाठी हे प्रयत्न आहेत.