सातासमुद्रापार पोहचली मुख्यमंत्री शिंदेंची ख्याती; न्यूयॉर्कमधील टाईम्स क्वेअरमध्ये लागले शिंदेंच्या वाढदिवसाचे बॅनर
Admin

सातासमुद्रापार पोहचली मुख्यमंत्री शिंदेंची ख्याती; न्यूयॉर्कमधील टाईम्स क्वेअरमध्ये लागले शिंदेंच्या वाढदिवसाचे बॅनर

देशभरात एकनाथ शिंदे यांचं नाव जोरदार चर्चेत आहे.

देशभरात एकनाथ शिंदे यांचं नाव जोरदार चर्चेत आहे. ९ फेब्रुवारीला आज मुख्यमंत्री शिंदेंचा वाढदिवस आहे. त्यांचे चाहते राज्य आणि देशातच नाही, तर परदेशातही आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ख्याती आता सातासमुद्रापार पोहोचली आहे. परदेशात देखील तरुणाईला त्यांच्या व्यक्तिमत्वाची भुरळ पडायला लागली आहे. त्यामुळेच न्यूयॉर्क येथे कामानिमित्त असलेल्या काही तरुणांनी त्यांचा वाढदिवस टाईम्स स्क्वेअर येथे केक कापून साजरा केला.

अमेरिकेत जगप्रसिद्ध टाईम्स स्क्वेअरमध्ये काही तरुणांनी एकनाथ शिंदेंना शुभेच्छा देणारा बॅनर हातात घेतला आणि त्यांचा वाढदिवस साजरा केला. हे फोटो सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत.“मुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर एकनाथ शिंदेंनी अत्यंत कमी वेळात धडाकेबाज निर्णय घेतले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातीलच नव्हे तर जगभरात राहणाऱ्या मराठी अमराठी माणसांच्या हृदयात एकनाथ शिंदे यांनी आपले एक विशेष स्थान निर्माण केले आहे. त्यामुळेच त्यांचा वाढदिवस न्यू यॉर्क येथे साजरा करण्याचा निर्णय घेतला.”असे ते म्हणाले.

ठाण्यातील युवासेनेचे कोअर कमिटी सदस्य नितीन लांडगे यांचे हे मित्र असून, त्यांच्याकडूनच कायम ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल ऐकत असतात. या मित्रांनी मिळून मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस टाईम्स स्क्वेअर येथे साजरा करण्याचा निर्णय घेतला. अभिनव जैन, राजीव पंड्या, रुचिता जैन अशी या तरुणांची नावे आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com