CM Ekanth Shinde,  Ajit Pawar
CM Ekanth Shinde, Ajit PawarTeam Lokshahi

अजित पवारांच्या विधानावर मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया; म्हणाल,धर्मवीर ही पदवी तुम्ही...

काल हिवाळी अधिवेशनात विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल एक विधान केले होते.

काल हिवाळी अधिवेशनात विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल एक विधान केले होते. या विधानावर भाजपा आणि शिंदे गटातील नेत्यांनी आक्षेप व्यक्त केला जात आहे. याचं पार्श्वभूमीवर आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सिल्लोमध्ये बोलताना म्हणाले की, “सर्वांनी माहिती घेऊन आणि तारतम्य बाळगून बोललं पाहिजं. कारण छत्रपती संभाजी महाराजांनी देशासाठी, धर्मासाठी स्वराज्यासाठी त्याग केला. संभाजी महाराजांवर औरंगाजेबाने अत्याचार केले, तरीही धर्म आणि स्वराज्यासाठी त्यांनी तडजोड केली नाही. धर्मवीर ही पदवी तुम्ही-आम्ही दिलेली नाही.”

“संभाजी महाराजांनी स्वराज्याचं रक्षण केलं आहे. त्यामुळे अजित पवार यांच्या सारख्यांनी असं बोलणं योग्य नाही. सर्व माहिती घेऊन त्यांनी बोललं पाहिजं. कारण, महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांवर अजित पवारांनी टीका केली होती. पण, अशा प्रकारचं वक्तव्य निंदाजनक आहे,” असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हणाले.

CM Ekanth Shinde,  Ajit Pawar
'अजित पवारांच्याविरोधात बोलण्याआधी आपली पात्रता पहावी' तुषार भोसलेंच्या मागणीवर राष्ट्रवादीची प्रतिक्रिया

काय म्हणले होते अजित पवार?

महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धेला खतपाणई घातलं जात नाही. बाल शौर्य पुस्कार हा किमान स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीदिनी देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी करावी. छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक होते, धर्मवीर नव्हते. त्यांनी कधीच धर्माचा पुरस्कार केला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. पण काहीजण जाणीवपूर्वक धर्मवीर उल्लेख करतात. मी मंत्रिमंडळात असतानाही त्यावेळी स्पष्ट सांगितलं होतं, संभाजी महाराजांचा उल्लेख हा स्वराज्यरक्षक असाच करावा, असे अजित पवार कल म्हणाले होते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com