Eknath Shinde
Eknath Shinde

"वैयक्तिक अहंकारामुळे राज्याला अधोगतीकडे नेण्याचं काम केलं", CM एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका

"आम्ही सरकार स्थापन केल्यावर 'गोविंदा'चा सण आला होता. त्यावेळी आम्ही म्हणालो, बिंधास्तपणे सण-उत्सव साजरे करा"
Published by :

व्यापारी, उद्योजकांना न्याय देण्याचं काम आपल्या सरकारनं केलं. सरकार बदललं नसतं, तर हे उत्सव आपल्याला साजरे करता आले नसते. प्रकल्पांवर बंदी होतीच. प्रकल्पांवर स्पीड ब्रेकर होते. आपल्या वैयक्तीक अहंकारामुळे राज्याला अधोगतीकडे नेण्याचं काम सुरु होतं. प्रकल्प थांबल्यामुळे राज्य मागे गेलं. त्यावेळी सण आणि उत्सवांनाही बंदी होती. आम्ही सरकार स्थापन केल्यावर 'गोविंदा'चा सण आला होता. त्यावेळी आम्ही म्हणालो, बिंधास्तपणे सण-उत्सव साजरे करा, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. ते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राजू वाघमारे यांच्या शिवसेना पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात बोलत होते.

शिंदे पुढे म्हणाले, गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर काँग्रेसचे ज्येष्ठ प्रवक्ते आणि महाराष्ट्र प्रदेशचे सरचिटणीस राजू वाघमारे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांचं मी स्वागत करतो आणि शुभेच्छा देतो. त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांना आलेला अनुभव त्यांनी सांगितलं आहे. आपली परंपरा आणि सण आता जोपासले पाहिजेत. तेव्हा कोविडपण पळून गेला. नाहीतर हे लोक कोविड कोविड करत बसले असते.

सर्व उत्सव आता लोक मोठ्या उत्साहाने साजरे करत आहेत. विकासासोबत या सर्व गोष्टी पाहिजेत. आजा लोकांची मानसिकता बदलली आहे. सर्व ठिकाणी विकासाचे प्रकप्ल सुरु आहेत. देशातले नंबर एकचे पायाभूत प्रकल्प आपल्या महाराष्ट्रात सुरु आहेत, असंही शिंदे म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com