Eknath Shinde
Eknath Shinde

"योजनांसाठी १० हजार कोटींची आवश्यकता आहे, कुठेही पैसे कमी पडू देणार नाही"; CM एकनाथ शिंदेंचं मोठं विधान

अहमदनगरच्या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धनगर समाजाबाबत मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
Published by :

Eknath Shinde Ahmednagar Speech : राज्य सरकारने केलेल्या योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी १० हजार कोटींची आवश्यकता आहे. कुठेही पैसे कमी पडू देणार नाही, हा सरकारचा शब्द आहे. आदिवासी समजाला ज्या योजना मिळतात त्या सर्व योजना धनगर समाजाला मिळाल्याच पाहिजेत. हा देखील आपला अजेंडा आहे. विविध योजनांसाठी १४० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. विद्यार्थ्यांसाठी विविध ठिकाणी आपण वसतीगृह बांधतोय. आता इथून पुढे अहिल्याबाई नाही, अहिल्या देवीच म्हटलं पाहिजे. तो जीआर सरकार काढेल. ज्यांनी देवता समान कार्य केलं आहे. त्यांनी एक राज्यकर्ता म्हणून आपल्या रयतेला सर्वोच्च स्थान दिलं. त्या पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या नावासमोर अहिल्यादेवी असंच नाव लागलं पाहिजे, असं मोठं विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. ते अहमदनगर येथे बोलते होते.

जनतेला संबोधीत करताना शिंदे पुढे म्हणाले, धनगर समाजाने नेहमी आपल्या सरकारला आशीर्वाद दिलं आहे. त्यामुळे सरकार तुमच्या पाठिशी खंबीरपणे उभं राहिल, हा शब्द मी तुम्हाला देतो. तुमच्या सर्वांच्या आशीवार्दाने ४ जूनला सर्वकाही चांगलं होईल. हे सरकार तुमचं आहे. हे सरकार सर्वसामान्यांचं आहे. हा मेंढपाळ, धनगर समाज प्रामाणिक आणि इमानदार आहे. सरकार दिलेल्या शब्दाचं पालन करतं. हा मुख्यमंत्री सर्व सामान्यांचा आहे. जे बोलतो, ते करून दाखवण्याची हिंम्मत पण दाखवतो. सर्वसामान्यांच्या जीवनात चांगले दिवस आणणारं हे सरकार आहे. तुमच्या जीवनात चांगले दिवस आले पाहिजेत, हेच आमचं उद्दीष्ट आहे.

दीड-दोन वर्षांच्या इतिहासात शेतकऱ्यांना १६ हजार कोटी रुपये नुकसान भरपाई देणारं हे महायुतीचं सरकार आहे. ४५ हजार कोटींच्या योजना देणारं हे महायुतीचं सरकार आहे. एक रुपयात पिक वीमा देणारं हे महायुतीचं सरकार आहे. महिलांचं सक्षमीकरण करणारं हे सरकार आहे. एसटीत ५० टक्के सवलत देणारं हे सरकार आहे. शेतकरी, कष्टकरी, कामगार, मुला-मुलींना, समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन पुढे जाणारं हे सरकार आहे. अहिल्यादेवींच्या विचारांवर आमची नितांत श्रद्धा आहे. या विचारांवरच आपल्या सरकारचा कारभार सुरु आहे. नागपूरला अधिवेशन होतं, त्या अधिवेशनात धनगर समाजासाठी आम्ही चांगले निर्णय घेतले आहेत, असंही शिंदे म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com