बातम्या
भाजपा-शिंदे गटाचा कसब्यात पराभव, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले...
कसबा पेठ व चिंचवड पोटनिवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागले होते.
कसबा पेठ व चिंचवड पोटनिवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. या मतदारसंघाचा निकाल आज जाहीर झाला असून चिंचवडमध्ये भाजपचा विजय झाला आहे. तर, 28 वर्षांनी भाजपचा बालेकिल्ला ढासळला असून कसब्यात मविआने बाजी मारली आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
एकनाथ शिंदे म्हणाले की, कसबा निवडणुकीतही मोठ्या प्रमाणात मतदारांनी आमच्यावर विश्वास दाखवला आहे. कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत केली आहे. या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. पुन्हा एकदा कामाच्या माध्यमातून कसब्याच्या मतदारांची मनं जिंकली जातील. असे शिंदे म्हणाले.
तसेच एका विजयाने एवढं हुरळून जाण्याची गरज नाही. महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे. एका मतदारसंघाची निवडणूक राज्याची निवडणूक होत नाही. त्यांना आनंद घेऊ द्या. असे म्हणत त्यांना टोला देखिल लगावला आहे.