बातम्या
सुट्टीवर नव्हे सध्या डबल ड्युटीवर; अडीच वर्ष घरी बसलेल्यांनी मला सांगू नये - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
कोकणातील राजापूरमधील बारसू येथील प्रस्तावित रिफायनरीवरून राजकीय वातावरण तापले आहे.
कोकणातील राजापूरमधील बारसू येथील प्रस्तावित रिफायनरीवरून राजकीय वातावरण तापले आहे. एकमेकांवर आरोप - प्रत्यारोप होत आहेत. विरोधकांनी यावरुन शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.बारसूचे आंदोलन चिघळल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करण्यात आली.
विरोधकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रजेवर गेले आहेत. अशी टीका केली होती. यावर प्रतिउत्तर देत मुख्यमंत्री म्हणाले की, मी सध्या सुट्टीवर नाही तर सध्या डबल ड्युटीवर आहे. अडीच वर्ष घरी बसलेल्यांनी मला सांगू नये. असे मुख्यमंत्री शिंदेंनी विरोधकांच्या टीकेला उत्तर दिले आहे.