'मेट्रो'चं कारशेड आरेमध्येच होणार!; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय

'मेट्रो'चं कारशेड आरेमध्येच होणार!; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय

महाविकास आघाडीचे सरकार असताना मेट्रोचे कारशेड हे कांजूरमार्गला (Kanjurmarg) हलवण्यात आले. मात्र आता पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आरे कारशेडवरील बंदी मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.
Published by :
Shweta Chavan-Zagade

नवे सरकार सत्तेत येताच पुन्हा एकदा मेट्रो 3 च्या कारशेडचा (Metro Carshed) मुद्दा तापला आहे. फडणवीस सरकारच्या काळात मेट्रो कारशेडसाठी आरेमध्ये जागा निश्चित करण्यात आली होती. मात्र राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना मेट्रोचे कारशेड हे कांजूरमार्गला (Kanjurmarg) हलवण्यात आले. मात्र आता पुन्हा एकदा ठाकरे सरकारच्या काळात स्थगिती देण्यात आलेल्या मुंबईच्या आरे परिसरातील मेट्रो कारशेडच्या कामावरील बंदी उठवण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी गुरुवारी यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत. एकनाथ शिंदे यांच्याकडून आरे कारशेडवरील बंदी मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.

'मेट्रो'चं कारशेड आरेमध्येच होणार!; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
Sonia Gandhi ED Summon : सोनिया गांधींची ईडीकडून तीन टप्प्यांमध्ये चौकशी, काँग्रेस आक्रमक

दरम्यान शिंदे-फडणवीस सरकारने राज्याची सूत्रे हाती घेताच हा निर्णय बदलण्यात आला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी त्यावर अधिकृतरित्या शिक्कामोर्तब केले. त्यामुळे आता आरेतील मेट्रो कारशेडचे काम सुरु करण्याचा मार्ग पुन्हा एकदा मोकळा झाला आहे. सरकारने आरेतील कारशेडवरील बंदी उठवली असल्याने मुंबईकर आणि पर्यावरणवादी अधिक आक्रमक होण्याची शक्यता आहे.

'मेट्रो'चं कारशेड आरेमध्येच होणार!; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
एकनाथ शिंदेंसोबत राहणे आमची मजबुरी; शिंदे समर्थक

आरे कॉलनीत ८०४ एकर परिसर आहे. यापैकी मर्यादीत भूभाग मेट्रो कारशेडसाठी वापरला जाणार आहे. उर्वरित आरे कॉलनी सुरक्षित राहणार आहे. शिवाय आरे कॉलनीत कारशेड केल्यामुळे मेट्रोची वाहतूक हाताळणे, मेट्रोची देखभाल करणे ही कामं सोपी होणार आहेत. कारशेडचे काम ठाकरे सरकारच्या काळात दीर्घकाळ स्थगित झाल्यामुळे राज्याला मोठा आर्थिक फटका बसला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com