CM Eknath Shinde
CM Eknath Shinde

"छत्रपती संभाजीनगरची जनता महाविकास आघाडीला धूळ चारल्याशिवाय राहणार नाही", CM एकनाथ शिंदेंचा घणाघात

छत्रपती संभाजी नगरची जनता या महाविकास आघाडीला धुळ चारल्याशिवाय राहणार नाही. महायुतीचे उमेदवार संदिपान भुमरे प्रचंड मताधिक्क्याने विजयी होतील, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
Published by :

CM Eknath Shinde Press Conference : कोर्टात गेलेले लोक महाविकास आघाडीचे आहेत. महाराष्ट्रातील दोन शहरांबाबत आज अतिशय मोठा निर्णय झालेला आहे. संभाजीनगरच्या नावाला विरोध करणाऱ्यांना मोठी चपराक बसली आहे. मी जिथे जातो, तिथे यश मिळतं. कालपासून मी इथे सभा घेतल्या आहेत. दोन-दोन दिवस मुख्यमंत्री छत्रपती संभाजी नगरमध्ये ठाण मांडून बसले आहेत, म्हणून माझ्यावर टीका होईल. मी ठाण मांडून बसल्यावर कार्यक्रम करुनच जातो. संभाजी नगरमध्ये तो करेक्ट कार्यक्रम ज्याचा कुणाचा व्हायचा तो होईल. छत्रपती संभाजीनगरची जनता या महाविकास आघाडीला धुळ चारल्याशिवाय राहणार नाही. महायुतीचे उमेदवार संदिपान भुमरे प्रचंड मताधिक्क्याने विजयी होतील, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

शिंदे पत्रकार परिषदेत म्हणाले, महायुतीचे सर्व कार्यकर्ते जोमाने शहरात आणि ग्रामिण भागात काम करत आहेत. संभाजी नगर शिवसेना आणि महायुतीचा बालेकील्ला आहे. बाळासाहेबांचं छत्रपती संभाजी नगरवर प्रेम होतं. छत्रपती संभाजी नगर असं नावं व्हावं, ही बाळासाहेबांची इच्छा होती. अडीच वर्ष ज्यांनी सरकार चालवलं, त्यांनी आम्ही सरकारमधून बाहेर पडल्यावर संभाजी नगरचा डाव रचला. परंतु, तो बेकायदेशीर होता.

त्यांच्याकडे संख्याबळ नव्हतं. आम्ही सरकार स्थापन केल्यावर हा निर्णय घेतला. आम्ही केंद्र सरकारकडे त्याचा पाठपुरावा केला. आज हायकोर्टाने यावर शिक्कामोर्तब केला आहे, हा तमाम संभाजी नगरकरांचा विजय आहे. निवडणुकांशी याचा संबंध जोडणारे लोक महाविकास आघाडीचे आहेत. संभाजीनगरचं नाव संभाजी नगर होऊ नये, हे औरंगाबाद औरंगजेबाचं व्हावं, अशाप्रकारची त्यांची भूमिका आज स्पष्ट झालेली आहे.

छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांचा ४१ दिवस त्यांचा छळ केला. छत्रपती संभाजी नगरची जनता या महाविकास आघाडीला धुळ चारल्याशिवाय राहणार नाही. कारण त्यांची भूमिका या निर्णयामुळे समोर आली आहे. आज उबाठाचीही काँग्रेस झालेली आहे. शहिद हेमंत करकरे यांचा अपमान करत आहेत. आदित्य ठाकरे म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी माझ्याशी समोर चर्चा करावी, राज्यातील उद्योगधंदे बाहेर कसे गेले, ते मी सांगतो, यावर बोलताना शिंदे म्हणाले, कोण आहेत आदित्य ठाकरे, त्यांना उत्तर द्यायला आमचे प्रवक्ते आहेत.

आज मी छत्रपती संभाजी नगरमध्ये आहे. याच दिवशी हायकोर्टात छत्रपती संभाजी नगर आणि आणि धाराशिव या दोन्ही नावांना मान्यता दिली. विरोधकांच्या याचिका फेटाळल्या आहेत. याबद्दल मी तमाम संभीजी नगरकरांचे आणि धाराशिवकरांचे मनापासून अभिनंदन करतो. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न खऱ्या अर्थाने पूर्ण झालं. हायकोर्टाचेही मी धन्यवाद मानतो, असंही शिंदे म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com