एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटला; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ट्विट करत म्हणाले...

एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटला; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ट्विट करत म्हणाले...

एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटलेला आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटलेला आहे. मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर हा संप एसटी कर्मचाऱ्यांनी मागे घेतलेला आहे. संप मिटल्याने लाखो प्रवाशांचा जीव भांड्यात पडलेला आहे. तसेच एसटी कर्मचाऱ्यांचा मूळ वेतनात तब्बल 6500 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

याच पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर काल आम्ही सामोपचाराने सर्वसहमत होईल असा तोडगा काढला आहे. एसटी कामगारांमध्येही आनंदाचे वातावरण आहे. त्यामुळे आता कोंकणासह राज्यभरात गणरायाच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांसमोरचा मोठा अडथळा दूर झाला आहे.

यासोबतच ते पुढे म्हणाले की, आपल्या या लाल परीमधूनही काही गणपती बाप्पा घरात येतात. त्यांच्या आगमनाची तयारी उत्साहाने आपल्याला करता येईल. आमच्या माता-भगिनींना, वृद्धांना आणि शाळकरी विद्यार्थ्यांना आता एसटीने आनंदाचा प्रवास करता येईल. असे मुख्यमंत्री म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com