CM Eknath Shinde: रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत जनतेसाठी काम करणार- एकनाथ शिंदे
राज्यात महायुतीचं सरकार आलं आहे, मात्र महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. यासंदर्भात महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेमध्ये एकनाथ शिंदे यांनी सत्तास्थापनेला माझ्यामुळे अडचण होणार नाही.
"जीवन में असली उडान बाकी है"- शिंदेंकडून उत्साही वाक्य
तर पुढे एकनाथ शिंदे म्हणाले की, निवडणुकीच्या निकालानंतर आपण पाहीले. राज्यातील जनतेला मनापासून धन्यवाद देतो आभार मानतो. हा जो काही विजय मिळवला ही लैंडस्लाइड विक्ट्री आहे.अडीच वर्षात महायुतीने केलेलेल जे काम आहे आणि लोकांनी दाखवलेला विश्वास आहे. जीवन में असली उडान बाकी है अभी तो नापी है मुठ्ठीभर जमीन अभी तो सारा असमान बाकी है असं देखील शिंदे म्हणाले.
रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत जनतेसाठी काम करणार- एकनाथ शिंदे
अजून खूप काम करायचं आहे. राज्याला विकासाकडे न्यायचं आहे आणि त्यामुळे आम्ही रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत जनतेसाठी काम करणार आहोत. मोदींनी देशाचं नाव जगभर रोशन केलं. आज देश आत्मनिर्भर झाला आहे. आत्म सन्मान झाला आहे. आपले रिलेशन इतर देशांसोबत डेव्हलप झाले आहेत. त्याचा फायदा महाराष्ट्राला होईल. त्यामुळे कोणती कोंडी काही राहू नये हे सांगण्यासाठी बोलावलं आहे. त्यामुळे वरिष्ठ जे निर्णय घेतील, तो मान्य असेल.