Devendra Fadnavis : मुंबईत फडणवीसांचा जोरदार प्रचार; महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय तापमान वाढलं
छत्रपती संभाजी नगरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा समृद्धीवरून ठाकरे गटावर हल्ला, MIMला ठाम नकार; फडणवीसांच्या मुंबईतील सभांनी राजकीय तापमान वाढलं....
मुंबईत प्रचाराचा जोर; अंधेरी–चेंबूरमध्ये जाहीर सभा
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीसांचा प्रचार दौरा अधिक तीव्र झाला आहे. शुक्रवारी मुंबईत अंधेरी आणि चेंबूर येथे त्यांच्या दोन जाहीर सभांचं आयोजन करण्यात आलं आहे. यासोबतच मीरा-भाईंदर आणि वसई परिसरातही फडणवीसांची तोफ धडाडणार असून, महायुतीचा विकास अजेंडा थेट जनतेपर्यंत पोहोचवण्यावर भर दिला जाणार आहे.
थोडक्यात
• छत्रपती संभाजीनगरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समृद्धी महामार्गावरून ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल केला.
• समृद्धी प्रकल्पावरून विरोधकांकडून होत असलेल्या टीकेला फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलं.
• एमआयएमसोबत कोणतीही युती होणार नाही, असा ठाम नकार फडणवीसांनी दिला.
• फडणवीसांच्या मुंबईतील सभांनी राज्यातील राजकीय वातावरण अधिक तापवलं.
• महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या सभांना विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झालं.

