ताज्या बातम्या
सीएनजीच्या दरात दुसऱ्यांदा वाढ; जाणून घ्या नवे दर
सर्वसामान्यांना आता पुन्हा एकदा महागाईची झळ बसणार आहे.
सर्वसामान्यांना आता पुन्हा एकदा महागाईची झळ बसणार आहे. सीएनजीच्या दरात वाढ झाली आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर सीएनजीच्या दरात दुसऱ्यांदा वाढ करण्यात आली आहे.
या आठवड्यात सीएनजीच्या दरात 1 रुपयाची वाढ करण्यात आली असून मुंबई आणि परिसरात सीएनजीचा दर प्रतिकिलो 77 रुपयांवरून 78रुपयांवर पोहोचला आहे. यासोबतच आता पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.