Cold Play च्या कॉन्सर्ट दरम्यान तरूणाई दारूच्या नशेत?
नवी मुंबईमध्ये कोल्ड प्ले या जागतिक दर्जाच्या संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे. देशभरातून या कार्यक्रमासाठी तरुणाई हजेरी लावत आहेत. १८, १९ आणि २१ जानेवारी रोजी या कॉर्न्सटचे आयोजन करण्यात आलं आहे. आधी या कॉर्न्सटच्या तिकीटविक्रीवरून गोंधळ पाहायला मिळाला होता. त्यानंतर नवी मुंबईमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात या कॉर्न्सटसाठी तरूणाई येत असल्याने वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. त्यानंतर आता स्टेडियमबाहेर खुलेआम मद्य प्राशन सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
तरूणांचं खुलेआम रस्त्यावरच मद्यप्राशन
डी वाय पाटील स्टेडीम बाहेरील वाइन शॉप असल्याने अनेक तरुण तरुणी मद्य प्राशन करत आहेत. शनिवारी रात्रीपासून याठिकाणी दारूच्या नशेमध्ये तरुण दिसत आहेत. मात्र, पोलीस प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होत नाही. त्यामुळे कोल्ड प्ले शोचे आयोजन केलेल्या नेरुळच्या डी वाय पाटील स्टेडिअम बाहेरील वाईन शॉप अजूनही सुरूच असून रस्त्यावर मद्य प्राशन केलं जात आहे. त्यामुळे या तरुणांवर व वाईन शॉप्सवर कारवाई कधी होणार असा सवाल उपस्थित केला जात आहे.
वाहतूक कोंडी होऊ नये पोलिसांची खबरदारी
नवी मुंबईमध्ये सुरु असलेल्या कोल्ड प्ले शो मुळे वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी वाहतूक पोलिस सकाळपासून रस्त्यावर पाहायला मिळत आहेत. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी स्वतः वाहतूक शाखेचे उपायुक्त तिरुपती काकडे हे आपल्या टीम सोबत रस्त्यावर उतरले आहेत. या कार्यक्रमामुळे सामान्य नागरिकांना याचा फटका बसू नये म्हणून वाहतूक पोलीस सज्ज झाल्याचं पाहायला मिळालं. मात्र, स्टेडियम जवळील रस्त्यावर तरूण खुलेआम मद्य प्राशन करत आहेत. याबाबत पोलीस काही कारवाई करणार का हा सवाल उपस्थित होत आहे.