थंडी वाढली; नाताळानंतर मुंबईसह राज्यात थंडी आणखी वाढणार

थंडी वाढली; नाताळानंतर मुंबईसह राज्यात थंडी आणखी वाढणार

राज्यात थंडी हळूहळू वाढत जाणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

राज्यात थंडी हळूहळू वाढत जाणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण तयार झालं होतं. तसेच काही ठिकाणी पाऊस देखील पडला होता. आता मात्र, मंदोस चक्रीवादळाचा प्रभाव कमी झाला आहे. त्यामुळं पुन्हा राज्यात थंडी जाणवू लागली आहे. मुंबईचं तापमान 24 अंश सेल्सिअसवरुन वरुन 19 अंशावर आलं आहे. त्यामुळं मुंबईतही थंडीची लाट येण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.

राज्यात गारठा वाढला आहे. थंडी वाढल्यानं ठिकठिकाणी नागरिकांनी शेकोट्या पेटवल्या आहेत. दरम्यान, नाताळनंतर मुंबई आणि उर्वरित महाराष्ट्रात तापमानात आणखी घट होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात किमान तापमानात घट झाली आहे. सध्या राज्यातील मराठवाड्यासह विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र चांगलाच गारठला आहे.

ख्रिसमसनंतर म्हणजे 25 डिसेंबरनंतर मुंबईत थंडी वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. मराठवाड्यात किमान तापमानात चांगलीच घट झाली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com