Winter Season : राज्यात थंडीचा कडाका वाढणार, IMD ने दिला ‘हा’ इशारा

Winter Season : राज्यात थंडीचा कडाका वाढणार, IMD ने दिला ‘हा’ इशारा

राज्यात पुन्हा एकदा वातावरणात बदल दिसून येत आहे. राज्यात काही दिवस आधी थंडी पडण्यास सुरुवात झाली होती. मात्र थंडीचा वातावरणीय बदलांमुळे (Winter) कडाका कमी झाला.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

राज्यात पुन्हा एकदा वातावरणात बदल दिसून येत आहे. राज्यात काही दिवस आधी थंडी पडण्यास सुरुवात झाली होती. मात्र थंडीचा वातावरणीय बदलांमुळे (Winter) कडाका कमी झाला. दरम्यान आता पुन्हा एकदा राज्यात थंडीचा कडाका वाढणार असल्याचा इशारा आयएमडीने दिला आहे. राज्यात हवामानाचा रंगच बदलायला लागला आहे भाऊ. दिवसभर एकीकडे ऊन तापतंय, गरम वारालोक शेतात काम करताना जाणवतोय, पण हवेत गारवापहाटे आणि संध्याकाळच्या सुमारास जाणवत आहे.

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा थंडीचा कडाका वाढणार आहे. मध्यंतरी हवेत गारवा जाणवत होता. मात्र थंडीचा कडाका तापमानात वाढ झाल्याने कमी झाला. निफाड, पुणे आणि अन्य ठिकाणी पारा घसरला होता. पर्वतीय राज्यांमध्ये म्हणजेच जम्मू कशमिर, हिमाचल, उत्तराखंडमध्ये बर्फाची चादर दिसून येत आहेर. संपूर्ण महाराष्ट्रभर उत्तरेकडून येणारे गार वारे आता पसरणार आहेत.

आयएमडीने तसा इशारा दिला आहे. राज्यात थंडीची लाट पुढील आठवड्यात येण्याची शक्यता आहे. रियाणा, पंजाबपासून, दिल्ली-एनसीआर, राजस्थान, बिहार अशा सहा राज्यांमध्ये किमान तापमान दहाच्या खाली जाणार आणि काही ठिकाणी पाऱ्याची सुई सात-आठ अंशांपर्यंत खाली घसरणार अशी परिस्थिती आहे.

पुढील काही दिवस कडाक्याची थंडी पडणार

पुणे आणि परिसरामध्ये किमान तापमानात किंचित वाढ होणार असून किमान तापमान १२ अंश सेल्सिअस इतके तर कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस नोंदविण्यात येणार आहे. आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याची शक्यता आहे. मात्र पुढील तीन दिवस कमाल आणि किमान तापमानात किंचित घट होण्याची शक्यता असून कमाल तापमान २८ अंश सेल्सिअस तर किमान तापमान ११ अंश सेल्सिअस पर्यंत नोंदविण्यात येणार आहे. आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.

थंडीचा कडाका राज्यात तीव्र होत असून पुन्हा एकदा किमान तापमानात मोठी घट होण्यास सुरुवात झाली आहे. म्हणूनच थंडीची ही लाट पुढील 48 तासांत अधिक तीव्र होणार आहे . यामध्ये पुणे अहिल्यानगर, नाशिक ,जळगाव, नंदुरबार, धुळे येथील किमान तापमान तीन ते चार अंशाने घसरेल असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात येत आहे. इतकंच नव्हे तर काही भागात पारा सात ते आठ अंशापर्यंत खाली येण्याची शक्यता असल्यानं राज्यात थंडीची लाट आणखी तीव्र होणार आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com