Winter Weather : राज्यात थंडी वाढणार, पुढील पाच दिवस गारठा कायम राहण्याची शक्यता

Winter Weather : राज्यात थंडी वाढणार, पुढील पाच दिवस गारठा कायम राहण्याची शक्यता

ऑक्टोबर अखेरीपर्यंत परतीचा पाऊस मुक्काम ठोकून राहिला. त्यामुळे उशिराने दाखल झालेल्या थंडीची तीव्रता आता वाआहे. मुंबईच्या हवेत गारवा पसरला आहे.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

थोडक्यात

  • महाराष्ट्रात थंडीची लाट

  • उत्तरेकडील शीत लहरींमुळे गारठा वाढला ...

  • आठवडाभर तापमान 20 अंशांच्या खालीच

ऑक्टोबर अखेरीपर्यंत परतीचा पाऊस मुक्काम ठोकून राहिला. त्यामुळे उशिराने दाखल झालेल्या थंडीची तीव्रता आता वाआहे. मुंबईच्या हवेत गारवा पसरला आहे. पुढील पाच दिवस राज्यात थंडीचा प्रभाव कायम राहण्याची शक्यता आहे. हवामान खात्यानुसार, किमान तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे. थंडीचा कडाका वाअसा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात थंडीची तीव्रता जास्त असेल. काही ठिकाणी थंडीची लाट कायम राहण्याची शक्यता आहे.

गेल्या आठवड्यापासून मुंबई तसेच उर्वरित महाराष्ट्रात थंडीची चाहूल लागली आहे. मागील तीन-चार दिवसांत थंडीची तीव्रता वाढण्यास सुरुवात झाली आहे. राज्यात सध्या कोरड्या हवेचा प्रभाव असून आकाश निरभ्र राहणार आहे. याचदरम्यान सकाळी आणि संध्याकाळी थंडीचा कडाका वाढणार आहे. 12 ते 15 अंशांपर्यंत विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात किमान तापमान खाली जाईल. मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर या शहरांमध्ये सकाळी गार वारे प्रवाहित राहतील, असे हवामान खात्याने म्हटले आहे. त्यामुळे मुंबईकरांसह राज्याच्या बहुतांश भागांतील नागरिकांना पुढील आठवडाभरात गुलाबी थंडीचा आनंद घेता येणार आहे.

आठवडाभर तापमान 20 अंशांच्या खालीच

परतीच्या पावसामुळे मुंबईकरांना दिवाळीत विचित्र वातावरणाला तोंड द्यावे लागले. मात्र मुंबईकरांसाठी पुढील आठवडा सुखद गारवा देणार आहे. शहराचे किमान तापमान 15 नोव्हेंबरपर्यंत 20 अंशांच्याच खाली राहील, असे भाकीत हवामान खात्याने केले आहे. त्यानंतरही गारठा वाढण्याची शक्यता हवामान शास्त्रज्ञांनी वर्तवली आहे. त्यामुळे मुंबईकरांना हुडहुडीपासून वाचण्यासाठी स्वेटर बाहेर काढावे लागण्याची चिन्हे आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com