रुबी हॉल क्लिनिकमध्ये किडनी रॅकेट चौकशीसाठी समिती स्थापन; तानाजी सावंत
Admin

रुबी हॉल क्लिनिकमध्ये किडनी रॅकेट चौकशीसाठी समिती स्थापन; तानाजी सावंत

गेल्यावर्षी रुबी हॉल क्लिनिक मध्ये किडनी रॅकेटचे प्रकरण उघडकीस आले.
Published by :
Siddhi Naringrekar

गेल्यावर्षी रुबी हॉल क्लिनिक मध्ये किडनी रॅकेटचे प्रकरण उघडकीस आले. यापूर्वी पुण्यातील किडनी तस्करी प्रकरणी रुबी हॉल क्लिनिकचे प्रमुख परवेझ ग्रांट यांच्यासह हॉस्पिटलमधील सहा डॉक्टरांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला होता.

याच पार्श्वभूमीवर आता रुबी हॉल क्लिनिक मध्ये किडनी रॅकेटची चौकशी करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली शासकीय आणि अशासकीय सदस्यांची समिती नेमून तीन महिन्यात याबाबत अहवाल सादर करणार असल्याची घोषणा आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी विधानसभेत केली आहे.

तसेच या आधी पुण्यात सुरू असलेल्या किडनी रॅकेटचा पर्दाफाश लोकशाही न्यूजने केला होता.या प्रकरणात सुरू असलेले किडनी रॅकेट लोकशाही न्यूजने समोर नागरीकांसमोर आणत प्रशासनावर अनेक सवाल उपस्थित केले होते. लोकशाहीच्या बातमीनंतर प्रशासन खडबडून जागे झाले असून आता रूबी हॉल क्लिनिकची मानवी अवयव प्रत्यारोपण केंद्राची मान्यता रद्द करण्यात आल्याची कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर आता चौकशी करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली शासकीय आणि अशासकीय सदस्यांची समिती नेमण्यात आली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com