Pune Sarasbagh Diwali Pahat : पुण्यातील सारसबाग दिवाळी पहाट कार्यक्रमात गोंधळ; पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात

Pune Sarasbagh Diwali Pahat : पुण्यातील सारसबाग दिवाळी पहाट कार्यक्रमात गोंधळ; पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात

पुण्यातील सारसबागेत आज दिवाळी पहाट हा कार्यक्रमाला सुरुवात झाली असताना पुण्यातील सारसबाग दिवाळी पहाट कार्यक्रमात गोंधळ झाल्याचे देखील दृष्य पाहायला मिळाले आहे.
Published by :
Prachi Nate
Published on

समाज माध्यमांवरून मिळणाऱ्या धमक्यांमुळे सारसबागेत आज दिवाळी पहाट हा कार्यक्रम रद्द करण्यात आला होता. पण, पोलिसांनी सुरक्षेची हमी दिल्याने पूर्वनियोजनानुसार पाडव्याच्याच दिवशी ‌’गोवर्धन पहाट दिवाळी‌’ हा कार्यक्रम सारसबागेत रंगणार आहे.

शनिवारवाड्यामध्ये नमाजपठणाच्या चित्रीकरणानंतर झालेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर समाज माध्यमांतून प्रसारित झालेल्या धमक्यांच्या व्हिडीओमुळे सारसबागेतील पाडव्याला होणारा दिवाळी पहाट कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय शहा यांनी सोमवारी घेतला होता.

मात्र, पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्याशी याबाबत झालेल्या चर्चेनंतर हा कार्यक्रम ठरल्याप्रमाणे होणार असल्याचे शहा यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान पुण्यातील सारसबाग दिवाळी पहाट कार्यक्रमात गोंधळ झाल्याचे देखील दृष्य पाहायला मिळाले आहे. दोन गटातील किरकोळ वादाच्या गोंधळामुळे सारसबागेबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. धक्का लागल्यामुळे दोन गटात वाद झाला होता पोलिसांच्या मध्यस्थीने वाद थांबला आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com