"...म्हणून काँग्रेसनं आंदोलनासाठी आजचा दिवस निवडला आणि काळे कपडे घातले"

"...म्हणून काँग्रेसनं आंदोलनासाठी आजचा दिवस निवडला आणि काळे कपडे घातले"

आजच्या आंदोलनाच्या माध्यमातून काँग्रेसने तुष्टीकरणाचा अजेंडा पुढे नेला.

देशभरात काँग्रेसने केलेल्या आंदोलनांवर गृहमंत्री अमित शहा यांनी निशाणा साधला आहे. काँग्रेसने प्रदर्शनासाठी आजचा दिवस का निवडला? आंदोलनासाठी काळे कपडे का घालण्यात आले, असा सवाल करत अमित शहांनी काँग्रेसवर टीका केली. गेल्या वर्षी याच दिवशी पंतप्रधान मोदींनी अयोध्येतील श्री रामजन्मभूमीवर मंदिराची पायाभरणी केली होती. आजचा दिवस साजरा करायला हवा होता, मात्र तुष्टीकरणाचा मार्ग निवडत काँग्रेसने शिलान्यासाच्या दिवशीच निषेध केला.

आत्तापर्यंत दररोज सामान्य कपड्यांमध्ये आंदोलनं केली जात होती. आज काळ्या कपड्यात आंदोलन का झालं? असा सवाल अमित शहांनी उपस्थित केला. काँग्रेसची अनेक वर्ष सत्ता होती, मात्र राम मंदिराचा वाद मिटला नाही. मात्र पंतप्रधान मोदींनी आजच्याच दिवशी अयोध्येत राम मंदिराची पायाभरणी केली आणि 500 वर्षांचा वाद संपुष्टात आणला.

"तुष्टीकरणाचे धोरण ना देशासाठी चांगलं आहे ना काँग्रेससाठी"

अमित शाह म्हणाले, अनेक ठिकाणी पराभव होऊनही काँग्रेस तुष्टीकरणाचं राजकारण सोडत नाहीयेत. आजच्या आंदोलनाच्या माध्यमातून काँग्रेसने गुप्तपणे तुष्टीकरणाचा अजेंडा पुढे नेला आहे. "तुष्टीकरणाचं धोरण ना देशासाठी चांगलंय, ना काँग्रेससाठी" असं म्हणत अमित शाहांनी काँग्रेसच्या आजच्या आंदोलनाच्या विषयाला वेगळं वळम देण्याचा प्रयत्न केला. ईडीच्या कारवाईवर बोलताना अमित शाह म्हणाले, प्रत्येकाने देशाच्या कायद्याचा पूर्ण आदर केला पाहिजे

"...म्हणून काँग्रेसनं आंदोलनासाठी आजचा दिवस निवडला आणि काळे कपडे घातले"
"पाठिंबा दिल्याबद्दल आभार..."; संजय राऊतांचं कोठडीतून पत्र

काँग्रेसकडून आज बेरोजगारी आणि महागाईविरोधात देशभरात विविध ठिकाणी निदर्शनं केली जात आहेत. स्वत: राहूल गांधी, प्रियांका गांधी यांच्यासह काँग्रेसचे सर्व नेते रस्त्यावर उतरलेले आहेत. निदर्शंनादरम्यान, पोलिसांनी आज प्रियंका गांधी वड्रा आणि इतर काँग्रेस नेत्यांना दिल्लीतील पक्ष मुख्यालयाबाहेरून ताब्यात घेतलं. पक्षाच्या इतर नेत्यांप्रमाणेच, काळा पोशाख परिधान केलेल्या प्रियंका यांनी पोलिसांनी लावलेले बॅरिकेड्स ओलांडून पलीकडे जात धरणे आंदोलन सुरु केलं. त्यानंतर महिला पोलिसांनी प्रियांका गांधींना उचलून पोलीस वाहनात बसवलं. काही वेळापूर्वी प्रियांकाचा राहुल गांधी यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. पोलिसांनी आमच्या लोकांना फरफटत नेल्याचा आरोप राहूल गांधींनी केला आहे.

राष्ट्रपती भवनाकडे मोर्चा आणि पंतप्रधानांच्या घराला घेराव घालण्यापूर्वी पक्षप्रमुख सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे खासदार संसदेत पोहोचले होते. सरकारने तपास यंत्रणांचा गैरवापर केल्याचा आरोप करत त्यांनी निषेध निषेध नोंदवला. त्यांनी केलेल्या गदारोळामुळे राज्यसभेचं कामकाज तहकूब करावं लागलं. पक्षाने जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, त्यांचे लोकसभा आणि राज्यसभेचे खासदार संसदेपासून निघणाऱ्या 'चलो राष्ट्रपती भवन' या मोर्चात सहभागी होतील. काँग्रेस कार्यकारिणी सदस्य आणि इतर वरिष्ठ नेत्यांनी "पंतप्रधानांच्या घरावाला घेराव" घालावा. मात्र पोलिसांनी सुरक्षेचं कारण देत काँग्रेसचे हे प्रयत्न उधळून लावले. अनेक प्रमुख ठिकाणी पोलिसांनी बॅरिकेड्स लावले. एवढंच नाही तर काँग्रेसच्या मोर्चापूर्वी दिल्लीतील काही भागात जमाव बंदी सारखे निर्णय प्रशासनाच्या वतीने लागू करण्यात आले. याच निर्बंधांचं कारण देत पोलिसांनी आंदोलनाला परवानगी नाकारली.

Lokshahi
www.lokshahi.com