Sachin Sawant Tweet
Sachin Sawant Tweet

Salman Khan House Firing : "...तर निष्क्रिय पोलिसांवर कारवाई करा...", काँग्रेस नेते सचिन सावंत याचं ट्विट चर्चेत

सलमान खानच्या वांद्रे येथील घराजवळ गोळीबार झाल्याची घटना नुकतीच घडलीय. या घटनेमुळं संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून राजकीय वातावरणही तापलं आहे.
Published by :

सलमान खानच्या वांद्रे येथील घराजवळ गोळीबार झाल्याची घटना नुकतीच घडलीय. या घटनेमुळं संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून राजकीय वातावरणही तापलं आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी ट्वीटरवर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. सलमानला गेले दोन वर्षे सातत्याने धमक्या येत होत्या. त्याने आयुक्तांची भेट ही घेतली होती. मग आजवर पोलिसांनी काय केले? का गुन्हेगारांना पकडू शकले नाहीत? जर ही बेफिकीरी असेल तर निष्क्रिय पोलिसांवर कारवाई झाली पाहिजे, असं सचिन सावंत ट्वीटरवर म्हणाले आहेत.

सचिन सावंत यांनी ट्वीटरवर म्हटलंय, सलमान खान यांच्या निवासस्थानी झालेल्या गोळीबाराची घटना महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेची भयावह स्थिती दर्शवते. सलमानला गेले दोन वर्षे सातत्याने धमक्या येत होत्या. त्याने आयुक्तांची भेट ही घेतली होती. मग आजवर पोलिसांनी काय केले? का गुन्हेगारांना पकडू शकले नाहीत? जर ही बेफिकीरी असेल तर निष्क्रिय पोलिसांवर कारवाई झाली पाहिजे. सलमान हा मुंबईतील प्रतिष्ठित नागरिक आहे. त्यांची ही अवस्था तर जनसामान्यांचे काय? गुन्हेगार आता बेफाम झाले असून त्यांना भीती राहिली नाही.

राज्यात गुन्ह्यांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. सध्याचे प्रशासन अंतर्गत राजकीय कुरघोडी हाताळण्यात, तपास यंत्रणांद्वारे विरोधकांना धमकवण्यात आणि त्यांचा आवाज शांत करण्यात व्यस्त आहे. त्यांच्याकडे प्रशासनासाठी वेळ नाही. त्यांच्यासाठी, सत्ता हे जनसेवेचे नसून वैयक्तिक स्वार्थाचे साधन आहे. जाहीर निषेध!

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com