Satej Patil on Sanjay Mandlik
Satej Patil on Sanjay Mandlik

काँग्रेसचे आमदार सतेज पाटलांचा खासदार संजय मंडलिकांवर पलटवार, म्हणाले, "निवडणुकीत भोगावं..."

खासदार संजय मंडलिक यांच्या वक्तव्याचा निषेध करत काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी पलटवार केला आहे.
Published by :

आत्ताचे महाराज हे कोल्हापूरचे आहेत का? ते दत्तक आले आहेत. ते खरे वारसदार नाहीत. तुम्ही आम्ही आणि कोल्हापूरची जनताच खरी वारसदार आहे, असं खासदार संजय मंडलिक छत्रपती शाहू महाराजांबद्दल म्हणाले होते. त्यामुळे राजकीय वातावरण तापलं आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी पलटवार करून मंडलिकांचा समाचार घेतला आहे. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराजांवर प्रेम असणारी जनता हे कदापी सहन करणार नाही. कोल्हापूरची जनता त्यांना मतदानाच्या माध्यमातून उत्तर देईल. स्वाभिमानी माणसं त्यांना कोल्हापूरी बाणा दाखवल्याशिवाय राहणार नाही. त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. निवडणूक हातातून चालली आहे, हे त्यांना दिसतय. निवडणूक वेगळ्या दिशेला घेऊन जायचा त्यांचा प्रयत्न यशस्वी होणार नाही. त्यांना याचे परिणाम निवडणुकीत भोगावे लागतील, असं म्हणत पाटील यांनी मंडलिक यांच्यावर घणाघाती टीका केली.

सतेज पाटील माध्यमांशी बोलताना म्हणाले, अशापद्धतीचं अपमानास्पद वक्तव्य केलं आहे. या निवडणुकीची सुरुवात झाली, तेव्हा चंद्रकांतदादा, मुश्रीफ असतील यांनी प्रसिद्धी माध्यमांतून सांगितलं की, शाहू महाराजांवर वैयक्तिक टीका कुणीही करणार नाही. या पद्धतीच्या सूचना देऊनसुद्धा संजय मंडलिक स्वत:च्या स्वार्थासाठी अशा पद्धतीची वक्तव्ये करत आहेत. निवडणुकीच्या रणांगणात लाखाच्या पुढे लीड आल्याने ते असं बोलत आहेत.

कोल्हापूरची जनता हे सहन करणार नाही. याचा निषेध आम्ही करतो. त्यांनी ते विधान मागे घेऊन माफी मागावी. तुम्ही कुस्ती करा ना. त्याबद्दल काही अडचण नाही. मग तुम्ही सातत्याने वक्तव्य का केली. महाराजांबद्दल वैयक्तिक टीका करणार नाही, हे तुम्ही जाहीरपणे सांगितलं होतं. पण आता कोल्हापूरची जनता हे सहन करणार नाही. शाहुप्रेमी लोक याचा निषेध नक्कीच करतील. मंडलिकांनी छत्रपती घराण्याचा अपमान केला आहे. त्यांनी सर्वांची माफी मागावी, अशी आमची मागणी आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com