आघाडी नाही झाली तर आमचे सर्व प्लॅन...; नाना पटोलेंनी सर्व सांगितले

आघाडी नाही झाली तर आमचे सर्व प्लॅन...; नाना पटोलेंनी सर्व सांगितले

येत्या 2024मध्ये आघाडी म्हणून लढू की नाही हे आताच कसं सांगू? असे सूचक विधान राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केलं.
Published by :
Siddhi Naringrekar

राज्यात अस्तित्वात असलेल्या महाविकास आघाडीसोबत आज असली तरी येत्या २०२४ मध्ये हाेणाऱ्या निवडणुकांमध्ये सोबत राहू अथवा नाही हे भविष्यातील सांगता येणार नाही, येत्या 2024मध्ये आघाडी म्हणून लढू की नाही हे आताच कसं सांगू? असे सूचक विधान राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केलं.

याच पार्श्वभूमीवर एका माध्यमाशी बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नाना पटोले म्हणाले की, महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढण्याचा आमचा मानस आहे. महाविकास आघाडीत सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा आमचा प्रयत्न आहे. मात्र पण आघाडी नाही झाली तर आमचे सर्व प्लॅन तयार आहेत. असे नाना पटोले म्हणाले.

नाना पटोलेंच्या या विधानाची राजकीय वर्तुळात आता चर्चा रंगली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com